महालक्ष्मी पतसंस्थेतर्फे सभासदांना १४ टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महालक्ष्मी पतसंस्थेतर्फे सभासदांना १४ टक्के लाभांश
महालक्ष्मी पतसंस्थेतर्फे सभासदांना १४ टक्के लाभांश

महालक्ष्मी पतसंस्थेतर्फे सभासदांना १४ टक्के लाभांश

sakal_logo
By

49779
करंबळी : महालक्ष्मी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना सुरेश मिसाळ. व्यासपीठावर बी. जी. भोसकी, शिवाजी पन्हाळकर, विकास पाटील आदी.

महालक्ष्मी पतसंस्थेतर्फे
सभासदांना १४ टक्के लाभांश
गडहिंग्लज, ता. १३ : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. संस्थेला अहवाल सालात ६४ लाख ९३ हजार ६२३ रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना १४ टक्क्यांप्रमाणे लाभांश देण्याची घोषणा सभेत करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पन्हाळकर यांनी स्वागत केले. संस्थापक विकास पाटील, संचालक डॉ. डी. के. गोटुरी, प्रा. डी. एम. पाटील, वसंत नाईक यांच्या हस्ते निवृत्त सभासदांचा सत्कार झाला. १२५ ज्येष्ठ सभासद, नागरिकांचा सत्कार डॉ. नागेश पट्टणशेट्टी, बसवराज रिंगणे यांच्या हस्ते झाला. संचालक सुभाष कोरे यांनी १४ मृत सभासदांच्या वारसांना जीवन ठेव योजनेतून ५० हजार रुपयांची दामदुप्पट ठेव ठेवली जाणार असल्याचे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचे वितरण झाले. दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सयाजी भोसले, शिवाजी पोवार यांच्या हस्ते सत्कार झाला. बचत गटांना सर्वाधिक कर्जपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.
व्यवस्थापक सुरेश मिसाळ यांनी अहवाल वाचन केले. प्रा. राम पाटील, पांडुरंग भोईटे यांच्यासह सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. विविध विषयांना मंजुरी दिली. संचालक प्रा. डी. एम. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95593 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..