इचलकरंजीत माकपतर्फे मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत माकपतर्फे मोर्चा
इचलकरंजीत माकपतर्फे मोर्चा

इचलकरंजीत माकपतर्फे मोर्चा

sakal_logo
By

49840
-------------
इचलकरंजीत माकपतर्फे मोर्चा
सरकारविरोधात घोषणाबाजी; २० तारखेपर्यंत मुदत
इचलकरंजी, ता. १३ : रेशनवरील धान्याचा अधिकार सोडण्याबाबतचा आदेश रद्द करावा, दारिद्र्यरेषेची उत्पन्नमर्यादा वार्षिक दोन लाख रुपये व्हावी, तसेच सध्या मिळणारे रेशन सुरू राहावे, या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन पुरवठा अधिकारी अमित डोंगरे यांच्याकडे दिले. पुरवठा कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. मागण्यांबाबत २० सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयास घेराओ घालण्याचा इशारा दिला.
निवेदनात, शहर परिसरामध्ये ‘अंत्योदय’ची ४८००, ‘बीपीएल’ व प्राधान्य कुटुंबे ३०००, पांढरी ४२००, तर केशरी कार्डधारक ४० हजार आहेत. त्रिगुण कुलकर्णी यांचा आदेश लागू झाल्यानंतर सर्वांचेच रेशनवरील धान्य बंद होणार आहे. काही लोक रेशनवरील धान्य विकतात, काही जनावरांना घालतात. त्याचा विपर्यास करून धान्यच बंद करण्याचा डाव राज्य आणि केंद्र सरकार करीत आहे. आजच्या काळात दुचाकी वाहन हे जगण्याचे महत्त्वाचे साधन झाले आहे. याचा अर्थ संबंधित कुटुंब दारिद्र्यरेषेवर आले, असा होत नाही. तीनचाकी रिक्षाचालकांना कमाईमध्ये जगताही येत नाही आणि मरताही येत नाही. तसेच जी भाड्याची चारचाकी वाहने आहेत, त्यांना बँकेचे हप्ते भरणेही कठीण होत असल्याचे नमूद केले आहे. मोर्चामध्ये भरमा कांबळे, सदा मलाबादे, भाऊसो कसबे, गोपाळ पोला, जीवन कोळी, सुभाष कांबळे, धनाजी जाधव आदी सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95641 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..