पगार द्या, अन्यथा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पगार द्या, अन्यथा आंदोलन
पगार द्या, अन्यथा आंदोलन

पगार द्या, अन्यथा आंदोलन

sakal_logo
By

49864
गडहिंग्लज : थकीत पगाराबाबत जीवन क्षीरसागर यांना निवेदन देताना गोडसाखर कामगार संघाचे पदाधिकारी, कामगार.

पगार द्या, अन्यथा आंदोलन
गोडसाखर कामगारांचा इशारा; कामगार आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या १५ महिन्यांचा पगार झालेला नाही. त्यामुळे कामगारांचे जगणे मुश्किल झाले आहे. प्राव्हिडंट फंड व इतर देय रक्कमा अद्याप न भरल्याने निवृत्त होणाऱ्या कामगारांना रिकाम्या हाताने जावे लागत आहे. त्यामुळे कामगारांना पगार व प्राव्हिडंट फंडाची रक्कम देण्याचे आदेश कारखाना प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखाना (गोडसाखर) कामगार संघातर्फे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. कामगार आयुक्तांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
ब्रिस्क कंपनीकडून हस्तांतरण झाल्यानंतर गतहंगामापासून कारखाना संचालक मंडळाने चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आर्थिक तरतूद वेळेत न झाल्यामुळे केवळ ७० हजार टन गाळप करून कारखाना बंद करावा लागला. त्यामुळे कामगारांचे वेतन थकीत राहत गेले आहे. एप्रिल २०२१ पासून कामगारांचा पगार नसल्याने त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कामगार हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. चालू गळीत हंगाम वेळेवर सुरु होईल की नाही याबाबत कोणताही खुलासा होत नाही. तरी कामगारांचे वेतन व प्राव्हीडंट फंडाची रक्कम भरण्यास कारखाना प्रशासनाला आदेश द्यावेत. अन्यथा कामगारांना सहकुटुंब आपल्या कार्यालयाच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
कामगार आयुक्तांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांनी स्वीकारले. साखर कामगार संघाचे अध्यक्ष अशोक मेंडूले, सचिव विजय रेडेकर, संचालक अरुण शेरेगार, श्रीकांत नार्वेकर, सुरेश कबुरी यांच्यासह कामगारांनी निवेदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95668 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..