मिरवणुकीतील लेझरमुळे तरुणाचा डोळ्यात जखम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरवणुकीतील लेझरमुळे 
तरुणाचा डोळ्यात जखम
मिरवणुकीतील लेझरमुळे तरुणाचा डोळ्यात जखम

मिरवणुकीतील लेझरमुळे तरुणाचा डोळ्यात जखम

sakal_logo
By

फोटो- ४९८९३
कोल्हापूर ः लेसर लाईटमुळे एका तरुणाच्या दृष्टिपटलाला झालेली जखम व त्यात झालेला रक्तस्त्राव.

मिरवणुकीतील ‘लेसर’ने डोळ्यात जखम
तरुणाच्या दृष्टिपटलातून रक्तस्त्राव, दृष्टी कमी होण्याचा धोका
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत वापरलेल्या लेसर लाईट किरणांमुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास होतो आहे. अशा रुग्णांनी नेत्ररोग तज्ज्ञांकडे उपचार सुरू केले आहेत. एका तरुण रुग्णाच्या दृष्टिपटलातून (रेटिना) रक्तस्त्राव सुरू झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. असे आणखी रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यांची दृष्टी कमी होण्याचा धोका आहे.
सलग दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सवाचा आनंद लुटता आला नाही. म्हणून यावर्षी सरकारनेच सर्वच सण धुमधडाक्यात साजरे करण्यासाठी सर्व निर्बंध उठवले. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यभरात उत्सवानिमित्ताने आनंदाला भरते आले होते. त्याचा सर्वाधिक जल्लोष विसर्जन मिरवणुकीत पहायला मिळाला. पोलिसांनी रात्री बारानंतर मोठ्या आवाजाच्या सिस्टीम बंद केल्या असल्या, तरी याच सिस्टीमचा दुपारपासूनच विसर्जन मिरवणुकीत दणदणाट सुरू होता. दणदणाटाच्या जोडीला मंडळांनी विसर्जन मार्ग उजळून टाकतील, असे लेसर लाईट इफेक्टस्‌ही मिरवणुकीत आणले होते.
गणेश आगमन मिरवणुकीतही लाईटचा वापर झाला, त्याचा फटका अनेकांच्या मोबाईलसह डोळ्यांनाही बसला आहे. याची माहिती असल्याने विसर्जन मिरवणुकीत अशा लाईटस्‌वर बंदीचा निर्णय पोलिसांनी घेतला. प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. मिरवणूक संपून दोन दिवस झाल्यानंतर त्याचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. लाईटच्या समोर आवाजाच्या दणदणाटात देहभान हरपून नाचलेल्या अनेकांच्या डोळ्यांना आता त्रास होऊ लागला आहे. यातील बहुतांशी रुग्ण २० ते २५ वयोगटातील आहेत. अशा काहींच्या डोळ्यांचे सिटीस्कॅन केले असता त्यांच्या दृष्टिपटलातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा तरुणांची दृष्टी कमी होण्याचा धोका आहे. काही डॉक्टरांनीच याविषयी चिंता व्यक्त केली आहे. शहरात जवळपास ६० ते ६५ जण यावर उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत.


डोळ्यांतील पडद्याच्या रक्तवाहिन्या नाजूक असतात. त्यावर लेसर लाईट पडल्यास त्या फुटण्याची शक्यता असते. त्याला वैद्यकीय भाषेत ‘फोटो टॉक्सिसिटी’ असे म्हणतात. त्याचबरोबर नाचताना आपला श्‍वास वर-खाली होतो. त्याचाही परिणाम डोळ्यांवर होतो. त्यातून रेटिनाच्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव झाला, अशा तक्रारी आता पुढे येत आहेत.
- डॉ. महेश दळवी, नेत्ररोग तज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95703 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..