डालडा (वनस्पती तूप) कुठे गेले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डालडा (वनस्पती तूप) कुठे गेले?
डालडा (वनस्पती तूप) कुठे गेले?

डालडा (वनस्पती तूप) कुठे गेले?

sakal_logo
By

49926

डालडा नव्या रूपात;
पण वापर झाला कमी
रोजच्या आहारात वाढले खाद्यतेल
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : टिनचा पिवळ डबा, डब्यावर पामच्या झाडाचं हिरव्या रंगाचं चित्र, पामच्या झाडाखाली ‘डालडा’ ही अक्षरं लिहिलेली असा हा मार्केटिंग आयकॉन बनलेला डालडा स्थित्यंतराच्या लाटेत हळूहळू दूर निघून गेला. आज टिनचा डबा जाऊन डालड्याचा नवा अवतार मार्केटमध्ये दिसू लागला आहे. एकेकाळी दररोजच्या आहारात वापरात असलेला डालडा लुप्त होत गेला. फक्त दसरा, दिवाळी किंवा अन्य सणासुदीत डालड्याचा वापर होतो. दररोजच्या आहारातील डालड्याची जागा नवनवीन खाद्यतेलांनी घेतली आहे. हा डालडा भारतीय संस्कृतीचा आयकॉन होता. रेशनवरही तो मिळत असे; पण आता तो पायऊतार होत गेला.
...

नेमकं काय झालं?
डालड्याच्या स्पर्धेत विविध कंपन्यांनी ब्रँड आणले. कोल्हापूरच्या मार्केटचा विचार केला तर चार ते पाच कंपन्यांचा डालडा नव्या रुपात पाहायला मिळतो. हा डालडा आता टिनऐवजी प्लास्टिकच्या पाऊचमध्ये मिळतो. १९९० नंतर लोकांचा आर्थिक स्तर विस्तारत गेला. लोक ‘हेल्थ कॉन्शस’ झाले. नव्या मध्यमवर्गीय कुटुंबात डालड्याची गरज संपली. सोयाबीन, राईसब्रान, भुईमूग, सरकी, ऑलिव्ह अशा बियांपासूनचे तेल घरात आले. नव्या अवतारात प्रकट झालेला डालडा जरी स्वयंपाकघरात आला तरी नव्या पिढीने तो अजूनही स्वीकारलेला नाही.

डालडा म्हणजे काय?
डालडा म्हणजे हायड्रोजिनेटेड तेल. तेलापासून बनवलेले तूप म्हणून वनस्पती तूप. ते दिसते साजूक तुपासारखे. रंगाने आकर्षक आणि चवीनं कसेतरीच. खाद्यतेलाच्या रेणूंच्या शृंखलेत हायड्रोजन रेणू आला. मग वनस्पती तूप तयार झाले. हे शक्य झाले ते पॅलॅडियम धातूमुळे. नऊशे पट हायड्रोजनचे रेणू वाहून नेण्याची क्षमता पॅलेडियममध्ये असते. हायड्रोजिनेशन केल्यावर तेलाचे वनस्पती तूप तयार होते. परदेशातून पाम क्रूड येते. त्यापासून डालडा तयार होतो. आज पामतेल ११० रुपये लिटर मिळते. क्रूडपासून तयार होणारा डालडा हा ९० ते १५० रुपये लिटरने मिळतो.

डालड्याचा वापर कुठे?
*हॉटेल व्यवसाय
*बेकरी उद्योग
*दसरा, दिवाळीच्या फराळात
*स्वीट मार्टस्
...

म्हणून डालडा नाकारतात
*डालड्यात ६० टक्क्यांपेक्षाही जास्त ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण
*ट्रान्स फॅटी अ‍ॅसिड जास्त प्रमाणात आरोग्याला घातक
-वजन वाढते, लठ्ठपणा
...


‘दिवाळी आली की, आम्ही बेसन लाडू, शंकरपाळी, म्हैसूरपाक, करंजीसाठी डालडा वापरतो. दररोजच्या आहारात तो वापरत नाही.’
-शीतल चौगले, गृहिणी, कसबा बावडा.

‘डालड्याचे नवीन ब्रँडस्‌ उपलब्ध आहेत. ग्राहकांनी हा डालडा चोखंदळपणे, पारखून घ्यावा. पूर्वी मोठ्या प्रमाणात ग्राहक डालड्याचा वापर करत होते. आज ही स्थिती नाही.’
-बबन महाजन, व्यापारी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95708 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..