पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर
पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर

पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर

sakal_logo
By

KOP२२L४९९२०, KOP२२L४९९१९ panchaganga pani patrabaher
49920
कोल्हापूर ः संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पंचगंगा नदीचे पाणी मंगळवारी पात्राबाहेर पडले.

पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर
‘राधानगरी’तून विसर्ग घटला; आज ‘यलो अलर्ट’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः यंदा पंचगंगा नदीचे पाणी आज तिसऱ्यांना पात्राबाहेर पडले. ते, यापूर्वी सहा जुलै आणि नऊ ऑगस्टला पडले होते. तीन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगेची पातळी वाढली. राजाराम बंधाऱ्यापाशी रात्री आठ वाजता पंचगंगेची पातळी ३०.९ फूट होती. तेथून ३१,३८७ क्युसेक विसर्ग सुरू आहे. इशारा पातळी ३९, तर धोका पातळी ४३ फूट आहे.
राधानगरी धरणाचे पाच व सहा क्रमांकांचे स्वयंचलित दरवाजे रात्री आठनंतरही खुले होते. त्यातून ४ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू होता. सकाळी धरणाचे ३, ४, ५ व ६ स्वयंचलित दरवाजे खुले होते. त्यातून सात हजार ३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी चारनंतर यापैकी तीन आणि चार क्रमांकाचे दरवाजे बंद झाले. जिल्ह्यात रात्री आठपर्यंत ५० बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. तेथील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
जिल्ह्यात गेली दोन दिवस ऑरेंज अलर्ट होता. आज दुपारपर्यंत शहरासह परिसरात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. दुपारनंतर सायंकाळी सात-आठ दरम्यान पावसाची भुरभुर होती. उद्या (ता. १४) यलो अलर्ट असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्या माहितीनुसार आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगडमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे किती नुकसान झाले, याची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे.

पाऊस असा
गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा - हातकणंगले- ७.८, शिरोळ -५.४, पन्हाळा- २५.७, शाहूवाडी- ३८.४, राधानगरी- ३९.४, गगनबावडा- ७०.८, करवीर- १५.२, कागल- १९.५, गडहिंग्लज- २८.३, भुदरगड- ३७.३, आजरा- ४५.६, चंदगड- ५२.९.

धरणातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात विसर्ग क्युसेकमध्ये)
राधानगरी ८.०५ (४४५६), तुळशी ३.४५ (५००),
वारणा ३४.३० (२५००), काळम्मावाडी २२.९९ (१४७०)
कासारी २.६६ (२५०), कडवी २.४८, कुंभी २.६६ (५६०),
चिकोत्रा - १.५२ (४००), चित्री १.८९ (४७०), घटप्रभा १.५६ (३९९३),
आंबेओहोळ १.०९ (९०) , पाटगाव ३.७२ (१६७७), जंगमहट्टी १.२२ (९८४), जांबरे ०.८२ (१०१८), कोदे लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.

आलमट्टी जलाशयातून
दीड लाखाचा विसर्ग
चिक्कोडी ः दमदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आलमट्टी जलाशयातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी सव्वा लाख क्युसेक असलेला विसर्ग मंगळवारी रात्री ९ वाजता दीड लाख क्युसेक करण्यात आला. जुलै व ऑगस्टमध्ये दोन वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी आलमट्टीतून विसर्ग वाढवून पूरस्थिती नियंत्रणात ठेवली होती. महाराष्ट्र व कर्नाटकातील समन्वयाने ही स्थिती हाताळली होती. आता पाऊस वाढल्याने लगेच विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे आलमट्टीत पाण्याची पातळी कमी होण्याची स्थिती आहे. ऑगस्टच्या पावसातही पाणी अधिक वाहून आल्याने तब्बल सव्वा दोन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग नेला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95737 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..