परदेशी खेळाडू खेळणार , फुटबॉल हंगाम रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशी खेळाडू खेळणार , फुटबॉल हंगाम रंगणार
परदेशी खेळाडू खेळणार , फुटबॉल हंगाम रंगणार

परदेशी खेळाडू खेळणार , फुटबॉल हंगाम रंगणार

sakal_logo
By

फुटबॉल फोटो

परदेशी खेळाडू खेळणार, हंगाम रंगणार  
११ संघांत तीन बाहेरील खेळाडू; संघाची बांधणी सुरू

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. १३ : कोल्हापूरच्या फुटबॉल मैदानावर पुन्हा परदेशी खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. सोबत जिल्ह्याबाहेरील एक अशा ११ संघांत एकूण तीन बाहेरील खेळाडू असणार आहेत. यामुळे यंदाचा फुटबॉल हंगाम चांगलाच रंगणार आहे. कोल्हापुरातील फुटबॉल संघांनी संघ बांधणीची तयारी सुरू केली आहे. यातच कोरोनामुळे परदेशी व जिल्ह्याबाहेरील खेळाडूंना संघात स्थान नसल्याने स्थानिक खेळाडूंनीच गत हंगाम गाजवला. आता मात्र नव्याने सुरू होणाऱ्या हंगामात हे चित्र वेगळे असणार आहे. डिफेन्स आणि फॉरवर्ड अशा दुहेरी भूमिका गरजेनुसार पार पाडू शकणारे परदेशी खेळाडू, तसेच एक जिल्ह्याबाहेरील खेळाडू अशा तीन खेळाडूंची चाचपणी सध्या सुरू आहे. नव्या हंगामाचे बिगुल अजून वाजले नसले तरीही याची जुळवाजुळव व संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘केएसए’च्या बैठकीनंतर हंगामाची तारीख निश्चित होणार असून, यंदाचा हंगाम चुरशीचा होणार आहे. ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती हे एआयएफएफच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्त झाले आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात अनेक परिणामकारक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाहेरील खेळाडू येथील खेळाडूंसमवेत खेळणे, मार्गदर्शन करणे यासोबतच येथील खेळाडूंना बाहेरील स्पर्धा साठीचे व्यासपीठ अधिक खुले होणार आहे.

कोट 
लवकरच नव्या हंगामाची घोषणा होणार असून यात अनेक बदल असणार आहेत. हंगामाची सुरुवात केएसए लीगने होऊन विविध स्वतंत्र स्पर्धा यात होणार आहेत. यंदाच्या हंगामातील जिल्ह्याबाहेरील, तसेच परदेशी खेळाडूंच्या सहभागाने पुन्हा एकदा येणारा हंगाम चुरशीचा होणार आहे.
- माणिक मंडलिक, जनरल सेक्रेटरी के. एस. ए.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95741 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..