चौगुलेंच्या कष्टामुळे ‘रवळनाथ’चा लौकीक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौगुलेंच्या कष्टामुळे ‘रवळनाथ’चा लौकीक
चौगुलेंच्या कष्टामुळे ‘रवळनाथ’चा लौकीक

चौगुलेंच्या कष्टामुळे ‘रवळनाथ’चा लौकीक

sakal_logo
By

49921
गडहिंग्लज : एम. एल. चौगुले यांचा सत्कार करताना कृष्णा मेणसे. शेजारी सविता चौगुले, मीना रिंगणे, व्ही. के. मायदेव, डॉ. किरण हत्ती, अर्चना देसाई आदी.

चौगुलेंच्या कष्टामुळे
‘रवळनाथ’चा लौकीक
कृष्णा मेणसे; चौगुले, डॉ. हत्ती, देसाईंचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : गरीब, शेतकरी कुटुंबातील एम. एल. चौगुले यांनी अगदी शून्यातून आभाळाएवढे काम केले आहे. त्यांची जिद्द व चिकाटीमुळेच रवळनाथचा महाराष्ट्र व कर्नाटकात शाखा विस्तार व देशपातळीवर नावलौकीक झाला आहे, असे गौरवोद्‌गार बेळगावचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कृष्णा मेणसे यांनी काढले.
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी, ज्ञानदीप प्रबोधिनी, इंटेट करिअरतर्फे आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. रवळनाथचे उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थापक चौगुले, त्यांच्या पत्नी सविता, डॉ. किरण हत्ती, जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त अर्चना देसाई यांचा गौरव झाला.
यावेळी प्रा. मायदेव यांचेही भाषण झाले. यावेळी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, आनंद मेणसे, अनिल उंदरे, दशरथ दळवी, शिवाजी होडगे, उज्ज्वला दळवी, विजयकुमार घुगरे, विजय आरबोळे, सुशांत करोशे, डॉ. संजय चौगुले, एस. एन. देसाई, मीना रिंगणे, रेखा पोतदार, सीईओ डी. के. मायदेव, चिदंबर मुनवळ्ळी, रोहित पोरवाल, संदीप कागवाडे, डॉ. सुभाष पाटील, संजीवनी पाटील, प्रभाकर द्राक्षे, समिधा चौगुले, शुभांगी करोशे, श्रद्धा निळपणकर, मनोहर गुरबे उपस्थित होते. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशासन अधिकारी सागर माने यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर. एस. निळपणकर यांनी आभार मानले.

चौकट...
निरक्षरता भूषणावह नाही
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना देशातील ३५ टक्के जनता अजूनही निरक्षर असणे भूषणावह नाही. देशभरातील नागरिकांना मतदानावेळी चिन्ह पाहून नव्हे, तर नाव वाचून मतदान करता आले पाहिजे, अशी अपेक्षा मेणसे यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95750 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..