मारामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारामारी
मारामारी

मारामारी

sakal_logo
By

२६८५
०२६८६

कौटुंबिक वादातून
दाजीला बेदम मारहाण
वारणानगरात घटना; वारनूळचा मेहुणा जखमी
कळे, ता. १३ : कौटुंबिक वादातून दाजीला मेहुण्याने ट्रॅक्टरच्या हायड्रॉलीक पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. अंतोष रंगराव पाटील (वय ३८, वारनूळ, ता. पन्हाळा) असे जखमीचे नाव आहे. संशयित संतोष पांडुरंग चोरगे (३०, वारणानगर) याच्याविरोधात सीपीआर पोलिस चौकीत गुन्हा नोंद झाला आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, अंतोष व त्यांची पत्नी सारिका यांच्यात वाद आहे. या वादातून दीड वर्षांपासून सारिका माहेरी वारणानगर येथे राहतात. त्यांना तीन मुली आहेत. दरम्यान, रविवारी (ता. ११) मुलींना भेटण्यासाठी अंतोष वारणानगरला गेले होते. तेथे त्यांच्या पत्नीने मुलींना भेटू दिले नाही. घराचा दरवाजा बंद करीत भाऊ संतोष याला बोलावून घेतले. तो स्पेअर पार्टच्या दुकानात कामाला असल्याने येताना दुकानातील ट्रॅक्टरची हायड्रॉलीक पाईपच घेऊन आला. येताचक्षणी तू इथे का आलास असे म्हणत शिवीगाळ करत खून करण्याची धमकी दिली व ट्रॅक्टरच्या हायड्रॉलीक पाईपने बेदम मारहाण केली. यात अंतोष गंभीर जखमी झाले. दरम्यान, अंतोष यांच्या पत्नीनेही मारहाणीत साथ दिली. अंतोष यांनी दोघांच्या तावडीतून सुटका करून घेतली. दुचाकीवरून पळून जात असतानाही पाठलाग करत हातावर मारहाण केली. मारहाणीत त्यांचा हात मोडला. तसेच, गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले. दरम्यान, कोल्हापुरात शिवाजी पुलावर आल्यावर चक्कर येऊ लागताच ते सीपीआरमध्ये दाखल झाले. रविवारी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. सोमवारी (ता. १२) सीपीआर चौकीत याची नोंद झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95758 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..