हद्दवाढ पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दवाढ पत्र
हद्दवाढ पत्र

हद्दवाढ पत्र

sakal_logo
By

हद्दवाढीचे महत्त्व
ग्रामस्थांना पटवून द्या
हद्दवाढ कृती समितीचे प्रशासकांना निवेदन
कोल्हापूर, ता. १३ ः ‘‘शहराच्या हद्दवाढीबाबत आपणासह अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्तावित गावांमध्ये जावे. महापालिकेची भूमिका पटवून समन्वय साधावा,’’ अशी मागणी शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीने महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुका लवकर होणार नाहीत. हा हद्दवाढीसाठी योग्य कालावधी आहे. त्याबाबत सरकारकडे योग्य पद्धतीने पाठपुरावा केला तर निर्णय घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे समितीच्या वतीने महापालिकेकडे पाठपुरावा चालवला आहे. ॲड. बाबा इंदूलकर यांनी आज त्याबाबत प्रशासकांना निवेदन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे, २०२१ मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्र्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने शहराचा हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. ज्या-ज्या वेळी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला, त्या वेळी प्रस्तावित गावांमधून त्याला विरोध केला गेला. शहराची हद्दवाढ अनिवार्य आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपण व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या गावांमध्ये जावे. त्यांच्याशी समन्वय साधून महापालिकेची भूमिका समजावून सांगण्याचा, पटवून देण्याचा ताबडतोब प्रयत्न करावा. आता महापालिकेची निवडणूक जाहीर झाली नसल्याने शहराची हद्दवाढ होणे सोयीचे ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95820 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..