आजरा नगरपंचायतीचा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा नगरपंचायतीचा वर्धापनदिन उत्साहात
आजरा नगरपंचायतीचा वर्धापनदिन उत्साहात

आजरा नगरपंचायतीचा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

49975
आजरा : येथील नगरपंचायतीमध्ये वर्धापनदिनानिमित्त केक कापतांना नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत, ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी, नगरसेवक व मुख्याधिकारी अजिंक्य पाटील व मान्यवर.

आजरा नगरपंचायतीचा
वर्धापनदिन उत्साहात
आजरा, ता. १३ : येथील आजरा नगरपंचायतीचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा चराटी, उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत, ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी, नगरसेवक व मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले, ‘‘आजरा शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी राजकारण बाजूला ठेवले. खिलाडूवृत्तीने सत्ताधाऱ्यांशी समन्वय साधत शहरात विविध विकासकामे राबविली आहेत. कोरोनाच्या काळात नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. या नगरपंचायतीने राज्यातील पहिला सौरऊर्जाप्रकल्प राबविला आहे. त्यामुळे नगरपंचायतीची वर्षाला चाळीस लाखांची बचत होणार आहे.
ज्येष्ठ नगरसेवक चराटी म्हणाले, ‘‘आगामी काळात नगरपंचायत इमारत, शहरविकास आराखडा, बायोगॅस प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणार आहे. आजरा शहराच्या विकासासाठी राजकारण बाजुला ठेवले आहे. पाणी योजना, भुयारी गटारी प्रस्तावित आहेत.’’ नगरसेवक विलास नाईक म्हणाले, ‘‘नगरपंचायतीमुळे शहराला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून शववाहिका मिळणार आहे.’’ नगरसेवक शुभदा जोशी, आनंदा कुंभार, संभाजी इंजल यांनीही मनोगत व्यक्त केली. या वेळी नगरसेवक संभाजी पाटील, अनिरुध्द केसरकर, किरण कांबळे, सुमैय्या खेडेकर, अस्मिता जाधव, शकुंतला सलामवाडे, रेश्मा सोनेखान, यासीराबी लमतुरे, यास्मीन बुड्डेखान, प्रशासन अधिकारी राकेश चौगुले, संजय यादव, मारुती मोरे, महादेव टोपले, नागरीक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95827 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..