प्लास्टिक जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिक जमा
प्लास्टिक जमा

प्लास्टिक जमा

sakal_logo
By

मनपा फोटो

49978
श्रेडर मशिनद्वारे
साडेसात किलो प्लास्टिक जमा
कोल्हापूर, ता. १३ : महापालिकेने १५ ऑगस्टपासून शहरात पाच ठिकाणी बसविलेल्या प्लास्टिक श्रेडर मशिनमध्ये आजअखेर साडेसात किलो प्लास्टिक जमा झाले. हे प्लास्टिक महापालिका करणा-या डांबरी रस्त्यांच्या कामांत वापरण्यात येणार आहे. ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळे शहराच्या आसपास असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. पर्यटकांकडून रिकाम्या झालेल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या कचऱ्यात जाण्याऐवजी श्रेडर मशिन बसवली. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणचा परिसर प्लास्टिकच्या बाटल्यांच्या कचऱ्यापासून स्वच्छ राहण्यास मदत होते. केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे प्लास्टिक कचऱ्याबाबत नियमावली तयार केली आहे. यानुसार दैनंदीन निर्माण होणारा प्लास्टिक कचऱ्यासाठी श्रेडींग मशिन कार्यान्वित केली आहेत. याचा रस्ते बांधणीच्या कामात वापर करणार आहे. बिंदू चौक पार्किंग, अंबाबाई मंदीर परिसर, रेल्वे स्टेशन, केशवराव भोसले नाट्यगृह व रंकाळा चौपाटी या वर्दळीच्या ठिकाणी मशिन बसविण्यात आली आहेत. १४ व्या वित्त आयोगातून १४ लाखांची तरतूद केली होती. १४ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यात बायोक्रुक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून सर्वात कमी दराने ९.८० लाखांची पाच मशिन उपलब्ध करून दिली आहेत.

डेंगी, चिकुनगुण्या सर्वेक्षणात
२८७ कंटेनरची तपासणी
कोल्हापूर : महापालिकेने शहरात १६८ घरांतील २८७ कंटेनरची तपासणी केली. त्यापैकी ७ घरांतील १४ कंटेनर दूषीत आढळले. शिवगंगा कॉलनी, साळोखेनगर, अयोध्या पार्क येथे किटकनाशक विभागाच्या पथकामार्फत सर्व्हे करण्यात आला. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून नारळाच्या करवंट्या, खराब डबे, वापरात नसलेले टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी.आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. फ्रिजमागील पाण्याचे ट्रे, झाडाच्या कुंडयात पाणी साचू देऊ नये. सर्वेक्षणासाठी येणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95844 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..