खासदार माने बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार माने बातमी
खासदार माने बातमी

खासदार माने बातमी

sakal_logo
By

४९९८०
लम्पीवर तातडीने उपाययोजना करा
खासदार धैर्यशील माने ः पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन
कोल्हापूर, ता. १३ ः कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामधील जनावरांच्या लम्पी साथीवर उपाययोजना करण्याबाबत व लम्पी साथीमधील मृत जनावरांना आर्थिक मदत देण्याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र देऊन चर्चा केली. यावर मंत्री विखे-पाटील यांनी जिल्ह्यात येऊन आढावा घेणार असल्याचे सांगितले.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पीची साथ पसरली आहे. विशेष करून शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील गाय व बैलांना लम्पीची लागण झाली आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे ८ लाखांवर पशुधन आहे. विशेषत: गोवर्गीय जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे; परंतु अपुरा कर्मचारी वर्ग व उपचारासाठी लागणाऱ्या साधनांचा पुरेसा अभाव यामुळे उपचार करताना शासकीय यंत्रणा तोकडी पडत आहे. जिल्ह्यामध्ये ११ ते १२ हजार खासगी पशुवैद्यक सेवा देत आहेत. परंतु, लम्पी आजाराबाबत त्यांना अपुरे ज्ञान असल्यामुळे जनावरांच्यावरती उपचार करणे मर्यादा येत आहेत व ही साथ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे खासगी पशुवैद्यकांना या रोगाबदलचे ट्रेनिंग द्यावे, अशी मागणी श्री. माने यांनी केली आहे.
लम्पीने ग्रस्त असणारे अनेक मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, साथ रोखण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवावी, आवश्‍यक साधनसाम्रगी द्यावी, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95855 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..