कांदा भाव पून्हा पडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा भाव पून्हा पडले
कांदा भाव पून्हा पडले

कांदा भाव पून्हा पडले

sakal_logo
By

घाऊक कांद्याचे भाव घसरले
५० ते १८० रुपये दहा किलो; किरकोळ बाजारात मात्र कांदा तेजीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक कांदा, बटाटा बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली; पण उठाव नसल्याने कांद्याचे भाव पुन्हा गडगडले. ५० ते १८० रुपये दहा किलो असा घाऊक भाव झाला आहे. किरकोळ बाजारपेठेत अद्यापि १२ ते २५ रुपये प्रतिकिलो भावात कांदा विक्री होत आहे.
मार्केट यार्डातील कांदा बाजारात दीड महिन्यापासून आवक वाढली. बहुतांशी कांदा पुणे, सोलापूर, नगर व सातारा ग्रामीण भागातून आला आहे. दिवसाला २० ते ३० गाडी कांदा बाजारात येतो. सौदेही होतात. अशात येथील कांदा गोवा, कर्नाटक, केरळकडे पाठवला जातो. पावसाळ्यामुळे तेथील पर्यटन हंगाम थंडावला आहे. त्यामुळे त्या राज्यातून फारशी मागणी नाही, त्यामुळे कोल्हापुरातील कांद्याचा पुरेशा प्रमाणात उठाव होत नाही. असे असताना आवक मात्र जोरात सुरू आहे. येथे आलेला कांदा परत पाठवणेही योग्य नसल्याने तो कांदा कमी भावात व्यापारी खरेदी करतात. परिणामी, प्रथम श्रेणी कांदा १८० रुपये तर द्वितीय श्रेणी कांदा १५० रुपये तर तृतीय श्रेणी कांदा ८० रुपये तर चतुर्थ श्रेणीतील कांदा ५० ते ६० रुपये १० किलो दराने घेतला जात आहे.

किरकोळ बाजार तेजीत
येथील घाऊक बाजारपेठेत १०० ते १५० रुपयांना दहा किलो कांदा घेऊन तोच कांदा किरकोळ बाजारपेठेत २० ते २५ रुपये किलोने विकला जातो. पावसाळ्यामुळे कांदा खराब होऊन विक्रेत्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढलेली असते. त्यामुळे दोन ते चार रुपये चढ्या भावात कांदा किरकोळ बाजारपेठेत विकावा लागतो तर हलक्या दर्जाचा कांदा अजूनही १० ते १५ रुपये एक किलो भावात विकला जात असल्याचे विक्रेते महंमद बागवान यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95869 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..