पोर्ले-उदयची सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्ले-उदयची सभा
पोर्ले-उदयची सभा

पोर्ले-उदयची सभा

sakal_logo
By

४०६३
वाय.डी. माने कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रम
कागल : येथील दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या वाय. डी. माने कॅम्पसमध्ये शिक्षक दिनानिमित विविध कार्यक्रम झाले. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्यावर भारतीय संस्कृती रुजवणे या जाणीवेतून हे आयोजन केले होते. संचालिका शिल्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले. वाय.डी. माने कॅम्पसमधील प्राचार्य, विभागप्रमुख, कौन्सिलर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध भेटवस्तू देऊन सन्मान केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संगीत खुर्ची स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. संचालक बिपीन माने यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमास सचिव भैया माने, उपाध्यक्ष सुनील माने यांसह सर्व विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, कौन्सिलर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

००६९०३
पळसंबे आश्रमशाळेस वॉटर प्युरिफायर
असळज : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या डी. वाय. पाटील कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे पळसंबे येथील आश्रमशाळेला कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते वॉटर प्युरिफायर भेट दिले. कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, चंद्रकांत खानविलकर, बजरंग पाटील, रवींद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, धैर्यशील घाटगे, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, तानाजी लांडगे, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सचिव नंदू पाटील, मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95898 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..