दसरा मेळावा होणार शिवाजी पार्कवरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळावा होणार
शिवाजी पार्कवरच
दसरा मेळावा होणार शिवाजी पार्कवरच

दसरा मेळावा होणार शिवाजी पार्कवरच

sakal_logo
By

शिंदे गटाचा
दसरा मेळावा
शिवाजी पार्कवरच
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १३ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा यंदा छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणीच होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज केला आहे.
शिंदे गटाच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी हा दावा केला. यावेळी आमदारांना संबोधित करताना शिंदे यांनी सर्वांनी शांत राहावे, असे आवाहन केले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार; परंतु जागा अद्याप ठरलेली नसल्याचे, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर, मुख्यमंत्री शिंदे २० सप्टेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहेत. त्याचप्रमाणे आमदारांनीही मतदारसंघात दौरे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95907 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..