गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

50050
गडहिंग्लज : ओंकार महाविद्यालयात ओंकार पोवार याचा सत्कार करताना राजन पेडणेकर. शेजारी डॉ. सुरेश चव्हाण, प्रा. सुरेश धुरे आदी.

ओंकार पोवारची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
गडहिंग्लज, ता. १४ : येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू ओंकार पोवार याची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रायपूर (छत्तीसगड) येथे नुकतीच पश्‍चिम विभागीय कनिष्ठ मैदानी स्पर्धा झाली. या स्पर्धेत ८०० मीटर धावणे प्रकारात ओंकारने सुवर्णपदक पटकाविले. त्याची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे प्रोत्साहन, तर शारीरिक शिक्षण संचालक सुरेश धुरे यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------------
घाळी महाविद्यालयात आरोग्य तपासणी
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात माजी विद्यार्थी असोसिएशन व जिमखाना विभागातर्फे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. आयुष हेल्थ क्लबच्या सहकार्याने झालेल्या शिबिरात ७९ जणांची तपासणी करण्यात आली. किसन धबाले यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. दत्ता पाटील यांनी स्वागत केले. आयुष हेल्थ क्लबचे शिवानंद मुसळे, निखिल खन्ना, काशिनाथ सोलापुरे, प्रा. अनिल उंदरे, प्रा. विकास अतिग्रे उपस्थित होते. डॉ. सचिन कोडोली यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95975 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..