पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

५००८१

मिरजकर तिकटी
येथे झाड कोसळले
मोटारीसह दोन वाहनांचे नुकसान
कोल्हापूर, ता. १४ ः मिरजकर तिकटी येथील एक झाड आज दुपारी अचानक कोसळले. त्याखाली असणाऱ्या मोटारीसह दोन वाहनांचे नुकसान झाले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मिरजकर तिकटी येथील पाण्याच्या हौदाजवळील कडुलिंबाचे झाड आज दुपारी अचानक कोसळले. त्याखाली असलेल्या मोटारीची काच, तर मोपेडचे नुकसान झाले. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडली. सुदैवाने त्यावेळी झाडाखाली कोणी नव्हते.
मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ दरवर्षी मिरजकर तिकटी वृक्षारोपण केले जाते. त्या वृक्षांचे संवर्धनही केले जाते. त्यामुळे या भागात अनेक मोठे वृक्ष आहेत, मात्र या वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटताना जाणीवपूर्वक समतोल साधला जात नाही. त्यामुळे झाडांना धोका पोचेल, अशी परिस्थिती निर्माण होते, असा आरोप अशोक पोवार यांनी केला. तसेच प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष्य घालावे, अशी मागणीही केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95992 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..