मोदींच्या वाढदिनानिमित्त सेवा पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींच्या वाढदिनानिमित्त सेवा पंधरवडा
मोदींच्या वाढदिनानिमित्त सेवा पंधरवडा

मोदींच्या वाढदिनानिमित्त सेवा पंधरवडा

sakal_logo
By

50076
गडहिंग्लज : भाजपच्या बैठकीत बोलताना राजेंद्र तारळे. व्यासपीठावर प्रीतम कापसे, प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, मारुती राक्षे, संदीप नाथबुवा आदी.

मोदींच्या वाढदिनानिमित्त सेवा पंधरवडा
गडहिंग्लज, ता. १४ : भाजपच्या येथील कार्यकारिणीची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. याअंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत हा सेवा पंधरवडा राबविला जाणार आहे. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, खादी स्टॉल, मोदींजींच्या पुस्तकांचे स्टॉल या कालावधीत लावण्याचे नियोजन या बैठकीत केले. तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, मार्तंड जरळी, अशोक पांडव यांची भाषणे झाली. संदीप नाथबुवा यांनी सेवाकार्य नियोजन वेळापत्रकाचे वाचन केले.
अनिल खोत, मारुती राक्षे, प्रकाश पाटील, एल. टी. नवलाज, संदीप रोटे, सतीश हळदकर, महादेव चिनगोंडा, अर्चना रिंगणे, संतोष कल्याणी, अविनाश दुध्यागोळ, भिकाजी पाटील, दीपक पाटील, संजय कुलकर्णी, प्रशांत पाटील, संजय रेडेकर, भीमा दुंडगे, सुहास पाटील आदी उपस्थित होते. प्रीतम कापसे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96007 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..