कुराडेंच्या कार्याला समाज न्याय देईल ः आमदार राजेश पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुराडेंच्या कार्याला समाज न्याय देईल ः आमदार राजेश पाटील
कुराडेंच्या कार्याला समाज न्याय देईल ः आमदार राजेश पाटील

कुराडेंच्या कार्याला समाज न्याय देईल ः आमदार राजेश पाटील

sakal_logo
By

50089

कुराडेंच्या कार्याला समाज
न्याय देईल : आमदार पाटील
अॅड. दिग्विजय कुराडेंचा वाढदिनी सत्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : कुराडे घराण्याने सामाजिक कार्याचे वलय निर्माण केले आहे. शिवराजच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू आहे. हा वारसा अॅड. दिग्विजय कुराडे यांना लाभला आहे. अॅड. कुराडे यांच्या कार्याला समाज नक्की न्याय देईल. आम्ही सतत त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.
येथील शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा झाला. याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज अध्यक्षस्थानी होते.
भरमू पाटील म्हणाले, ‘‘शिवराजमधून निष्ठेने शैक्षणिक कार्य सुरू आहे. निष्ठेपुढे कोणतीच ताकद चालत नाही.’’ अॅड. कुराडे यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. यापुढेही अशाच पद्धतीने कार्यरत राहीन, असे सांगितले. भगवानगिरी महाराज, ‘शिवराज’चे सचिव डॉ. अनिल कुराडे, अमर चव्हाण, विष्णुपंत केसरकर, एल. टी. नवलाज, राजगोंड पाटील, उदय देशपांडे, अभय देसाई यांचीही भाषणे झाली.
बसवराज आजरी यांनी स्वागत केले. माजी आमदार बजरंग देसाई, विक्रम चव्हाण-पाटील, प्रकाश चव्हाण, अॅड. हेमंत कोलेकर, सदानंद हत्तरकी, प्रकाश पताडे, अभिषेक शिंप्पी, पांडुरंग लोंढे, जे. बी. बारदेस्कर, प्रा. किसनराव कुराडे, जे. वाय. बारदेस्कर, के. जी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, बाबासाहेब पाटील, रमेश रिंगणे, शंकरराव नंदनवाडे, राजेंद्र मांडेकर, जयसिंग चव्हाण, राजू कुलकर्णी, अजित चोथे आदी उपस्थित होते. प्रा. अशोक मोरमारे व डॉ. श्रद्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

चौकट...
वह्यांचे संकलन आणि आर्थिक मदत...
अॅड. कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज फाउंडेशनतर्फे एक वही भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविला होता. यात दीड हजार वह्यांचे संकलन झाले. गरीब विद्यार्थ्यांना त्याचे वितरण केले जाणार आहे. तसेच शिवराज फाउंडेशनतर्फे आयुष कोरी याच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96036 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..