नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक
नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक

नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक

sakal_logo
By

50351
आजरा : येथील तहसीलदार कार्यालयात लम्पी रोगाविषयी बैठकीत सूचना करताना तहसीलदार विकास अहिर. या वेळी गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, पी. डी. ढेकळे व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी.

नियंत्रणासाठी काळजी आवश्यक
लम्पी रोगाबाबत आवाहन; आजरा तहसील कार्यालयात बैठक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १५ : लम्पी या चर्म रोगाने राजस्थान व पंजाब या राज्यात धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अतिग्रे व कबनूर परिसरात याचा आढळ झाला आहे. त्यामुळे दक्षतेचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. आजरा तालुक्यातही नियंत्रणासाठी काळजी घेण्यासाठी आवश्यक उपाय योजना पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत आहेत. जनजागृती करण्यात येत आहे. लम्पी रोगाच्याबाबत सर्वत्र दक्षतेचे आवाहन केले जात आहेत. आजरा तालुक्यात नुकतीच याबाबत तहसीलदार कार्यालयात बैठक झाली. तहसीलदार विकास अहिर अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी सुधाकर खोराटे, डॉ. पंकज सोनवणे, डॉ. ए. बी. वाघमोडे आदी प्रमुख उपस्थित होते.
आजरा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. डी. ढेकळे यांनी रोगाची लक्षणे व आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती दिली. सदरचा आजार हा विषाणूजन्य असून तो संसर्ग जन्य आहे. या रोगाचा प्रसार चावणाऱ्या माशा, डास, गोचीड, चिलटे, बाधित जनावरांशी संपर्क, बाधित चारा व पाणी यामुळे होतो. या आजारामध्ये जनावरांच्या अंगावर दहा ते पन्नास मिलिमीटर व्यासाच्या गाठी येतात. भरपूर ताप येतो. डोळे व नाकातून चिकट स्त्राव येतो. दूध उत्पादन कमी होते. काही जनावरांमध्ये पायाला सुज येऊन जनावर लंगडते. बाधित जनावरे उपचाराने दोन ते तीन आठवड्यात बरी होतात. क्वचीतप्रसंगी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे या रोगाचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागृक रहावे. रोग प्रसारक कीटकाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करावी. जनावरांची खरेदी विक्री टाळावी. लम्पी सदृश लक्षण आढळल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. तहसीलदार अहिर यांनी सूचना केल्या. डी. ए. मुल्लानी यांनी बैठकीचे नियोजन केले.
--------------
आजरा तालुक्यातील पशुधन
गायवर्ग - ६९८२
म्हैशवर्ग - २७८३८
एकूण - ३४८२०

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96044 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..