जनावरांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे धास्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनावरांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे धास्ती
जनावरांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे धास्ती

जनावरांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे धास्ती

sakal_logo
By

50136

जनावरांच्या वाढत्या चोऱ्यांमुळे धास्ती
पशुपालक चिंतेत; आजऱ्यात सहा ठिकाणी चोऱ्या, बंदोबस्ताची मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १४ : गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्या, म्हैशी चोरीचे प्रकार या काही महिन्यात वाढले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी जनावरे पळवण्याचे प्रकार घडले आहेत. हजारो रुपयांची जनावरे चोरटे विनासायास पळवत असल्याचे पाहून पशुपालक धास्तावले आहेत. त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पशुपालकांतून होत आहे. तालुक्यात या सहा महिन्यांत सहा गावांत चोरट्यांनी जनावरे पळवल्याच्या घटना घडल्या. याची नोंद आजरा पोलिसांत झाली आहे.
गावापासून दूरवर रानात जनावरे बांधण्यासाठी गोठे आहेत. अशा गोठ्यात जनावरांची व्यवस्था ठेवणे शेतकऱ्यांना सोपे जाते. शेतीकामासाठी गेल्यावर जनावरांच्या चाऱ्याची तरतूद शेतातून सहज करता येत असल्याने तालुक्यात अनेक गावात शेतात जनावरे बांधण्यासाठी गोठे व बकऱ्यांसाठी पत्र्यांचे शेड आहेत. दिवसभर शेतात काम केल्यावर शेतकरी व पशुपालक रात्री जनावरांची सोय लावून घरी परतात. परत दुसऱ्यादिवशी जनावरांची उस्तरवार केली जाते. हा या परिसरातील शेतकरी व पशुपालकांचा दिनक्रम आहे. आजपर्यंत जनावरे चोरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या नाहीत. क्वचित एकाद्या गावात जनावरे चोरल्याचे ऐकण्यास मिळत असे. आजरा तालुक्यात अशा घटना विशेषतः घडल्या नाहीत. कोरोना नंतरच्या काळानंतर जनावरे चोरींच्या घटनामध्ये मात्र वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. या सहा महिन्यांमध्ये जनावरे चोरीचे प्रकार वाढले आहेत. उत्तूर व पूर्व भागातील जनावरे पळवली आहेत. कोवाडे, कोळिंदे, उत्तूर, सुळे या परिसरातून शेळ्या व म्हैशीची चोरी झाली आहे. भादवण येथून मंगळवारी (ता. १३) दोन शेळ्या चोरीला गेल्या आहेत. वाढत्या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे चिंतेचे वातावरण आहे. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून अशा प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
-------------------
चौकट
पाळत ठेवून चोऱ्या
रानात असलेल्या गोठ्यावर पाळत ठेवली जाते. त्या गोठ्यात किती जनावरे आहे. वाहन जाते काय याची खात्री करून चोरटे संबंधित ठिकाणी चोरी करतात. सीमाभागात जाऊन याची विक्री करत असल्याची शक्यता पशुपालकातून व्यक्त होत आहे.
---------------
कोट
संशयास्पदरित्या जनवारे घेऊन जात असताना शेतात व किंवा निर्जन ठिकाणी वावर आढळल्यास तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. जनावरांच्या गोठ्याची सुरक्षिततेच्यादृष्टीन योग्य ती काळजी घ्यावी. शेतात राखणीला थांबावे. पोलिसांकडून शोध मोहीम राबविली जात आहे. यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
- सुनील हारुगडे, सहायक पोलिस निरीक्षक, आजरा पोलिस ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96049 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..