गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

‘क्रिएटीव्ह’मध्ये हिंदी दिन
गडहिंग्लज : येथील क्रिएटीव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव अण्णासाहेब बेळगुद्री अध्यक्षस्थानी होते. सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी कवितावाचन, गीतगायन, नृत्य, वक्तृत्व, एकांकिका अशा विविध कला सादर केल्या. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांनी हिंदी भाषेबद्दल माहिती दिली. सिद्धी चव्हाण, हर्षिता खोपकर या विद्यार्थिनींची भाषणे झाली. रिया येळापूर हिने सूत्रसंचालन केले. विद्या हरणे यांनी आभार मानले.
-----------------
‘किलबिल’मध्ये विविध स्पर्धा
गडहिंग्लज : येथील किलबिल विद्या मंदिरमध्ये हिंदी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, गायन, नृत्य आदी माध्यमातून हिंदी दिनाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. सरस्वती हत्ती, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, शहजादी पटेल, भारती शेट्टी, ज्योती अलमा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
-------------------
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये भित्तिपत्रिकेचे अनावरण
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. रिना कांबळे, कुशाली गोविंदगोळ, सुहासिनी चौगुले, तृप्ती गोरुले या विद्यार्थिनींनी भित्तिपत्रिका तयार केली होती. तिचे अनावरण मुख्याध्यापक पी. टी. पाटील यांच्या हस्ते झाले. सी. व्ही. महाजन, एस. एस. शिंदे, एस. डी. कांबळे, सौ. एस. पी. पाटील, डी. बी. कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96076 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..