जेऊर - वडगाव एस टी बस सेवा पुन्हा सुरू करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेऊर - वडगाव एस टी बस सेवा पुन्हा सुरू करावी
जेऊर - वडगाव एस टी बस सेवा पुन्हा सुरू करावी

जेऊर - वडगाव एस टी बस सेवा पुन्हा सुरू करावी

sakal_logo
By

भारतीय दलित महासंघाची मागणी
देवाळे ता.१४
जेऊर(ता.पन्हाळा)येथे बंद झालेली जेऊर ते वडगाव एस.टी.बससेवा पून्हा पूर्ववत सुरु करावी या मागणीचे निवेदन भारतीय दलित महासंघाच्या वतीने मलकापूर आगार व्यवस्थापक अनिल पाटील यांना देण्यात आले.बस सेवा बंद असलेने देवाळे,वारणानगर,कोडोली व वडगाव या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थांना रोज पायपीठ करावी लागत असून नोकरी व्यवसाया करीता रोज ये जा करणाऱ्या प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.तरी लवकारात लवकर एस टी बस सेवा पुन्हा सुरु करून विद्यार्थी व प्रवाशांचे हाल थांबवावेत अशी मागणी संघटनेच्या वतीने केली आहे.यावेळी भारतीय दलित महासंघ जिल्हाध्यक्ष अमर काळे,पन्हाळा तालुका अध्यक्ष आदिनाथ रणभिसे,आकाश कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - जेऊर वडगाव एस टी बस सेवा पुन्हा सुरू करावी मागणीचे निवेदन मलकापूर आगार व्यवस्थापक यांना देताना पदाधिकारी

भामटे येथे रक्त गट तपासणी शिबिर
पुनाळ,ता.१४: आनंदी शिक्षण प्रसारक मंडल कळंबे तर्फ कळे (ता.करवीर)घ्या वर्धापन दिनानिमित्त रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केले होते. आनंदी कॉलेज ऑफ फार्मसीच्या एन्.एस.एस युनिटने संस्थेच्या १७व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विद्या मंदिर भामटे येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्त गट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष सतीश देसाई ,सचिव डॉ.विद्या देसाई व भामटे गावचे सरपंच यांच्या उपस्थितीत झाले.सूत्रसंचालन सुजित साळोखे यांनी केले.शिबिरात शंभर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मोफत रक्त गट तपासणी करण्यात आली. यावेळी डाॅ. राहुल अडनाईक यांनी रक्त गटाचे विविध प्रकार व त्यांचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य डाॅ पिशवीकर, काॅलेज व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,सौ. प्रतिभा अडनाईक, आरती वर्णे, रविराज गायकवाड व स्वप्नील पाटील उपस्थित होते. आभार सौ.ऋतुजा शहा यांनी मानले .
* फोटो- भामटे- शिबिराचे उद्घाटन करताना संस्थापक सतिश देसाई,विद्या देसाई आदी.


अध्यक्षपदी दत्तात्रय लवटे.
पुनाळ, ता. १४: कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विज्ञान विषय समितीची कार्यकारिणी जाहीर झाली.यामध्ये अध्यक्षपदी ज्योतिर्लिंग हायस्कूल बोरगावचे मुख्याध्यापक दत्तात्रय एस.लवटे यांची निवड करण्यात आली.अन्य निवडी अशा: कार्यवाहक/सचिव निवास फराकटे, आर.डी.पिष्टे .सहकार्यवाहक पी.ए.पाटील, अनंत भोगन ,टी.टी.सुतार, ए.बी.दिवटे यांची निवड करण्यात आली.संघाचे सचिव दत्ता पाटील , संघ प्रतिनिधी प्रकाश पोवार यांच्या उपस्थित निवडी झाल्या.रामराव इंगवले हायस्कूल हातकणंगलेच्या मुख्याध्यापिकापदी सौ एस .एम ‌पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी एस.एस.हजारे ,ओंकार कुलकर्णी ,महेश नेर्लेकर,भरत कतकर, एम.आर पाटील, श्रीकांत चव्हण, श्री.माळकर उपस्थित होते.

आर.आर.खडके अकॅडेमीमध्ये हिंदीदिन साजरा
फोटो - बोरपाडळे : हिंदी दिनानिमित्त सांस्कृतिक वेशभूषेत विद्यार्थी, सोबत प्राचार्य अविनाश खडके व मान्यवर
-------------
बोरपाडळे,ता.14: येथील श्री. आर.आर.खडके फौंडेशन संचलित पन्हाळा व्हयली इंग्लिश मेडीयम स्कुल, ज्युनिअर कॉलेज,आई विद्यानिकेतन आणि शर्विल खडके हायस्कुल बोरपाडळे आदी संस्थांमध्ये 14 सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिन उत्साहात साजरा झाला.
उपप्राचार्या रश्मी पोवार यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मच्छिन्द्र चौगुले होते.विद्यार्थी भाषणे,समूहगान,वेशभूषा आणि सांस्कृतिक नृत्याचा अविष्कार झाला.त्यानंतर
प्रमुखपाहुणे संस्थापक प्राचार्य अविनाश खडके यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी हिंदी राष्ट्रभाषेचे महत्व याबद्दल सुलक्षणा मोरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्राचार्या सौ. क्रांती खडके,प्रा.मुरलीधर लोहार,उपप्राचार्या अयोध्या पाटील आदींची उपस्थिती होती.

03891

----
गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार
जयसिंगपूर, ता. १३ : चिपरी (ता. शिरोळ) येथील जिनगोंडा बाळगोंडा पाटील हायस्कूलमध्ये एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार केला. राजगोंडा पाटील अध्यक्षस्थानी होते. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी सृष्टी शिंत्रे, विनीत कांबळे, श्वेता मोहिते, अथर्व घोलप, श्रुती मोहिते, गौरव मोहिते, किरण परब, श्रेया पोवार, श्रेणिक ढवळे यांना ३ लाख ६४ हजार ८०० रुपये शिष्यवृत्ती मिळाली. विद्यार्थी, पालकांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक एस. एल. चिगरे, पर्यवेक्षक पी. ए. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कुणाल कांबळे यांनी शिल्ड व वृक्ष भेट दिली. राजगोंडा पाटील, अभय पाटील, अशोक मगदूम, बापूसो नांद्रेकर, भरत कांबळे, मायाजीराव बेडगे, शरद कांबळे, सुनील पवार, धनपाल शिंगे आदी उपस्थित होते. आर. के. गावडे यांनी आभार मानले. एस. एस. गावडे यांनी सूत्रसंचालन केले.

49793
पूर्वा शेवाळेची निवड
इचलकरंजी : मुंबई येथे झालेल्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप धावणे स्पर्धेमध्ये अठरा वर्षे खालील वयोगटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पूर्वा शेळके हिने रौप्यपदक पटकावले. तिची छत्तीसगड येथे होणाऱ्या वेस्टर्न झोन नॅशनल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, राजगोपाल डाळ्या, बाबासाहेब वडिंगे, मारुतराव निमणकर यांनी पूर्वाचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, आर. एस. पाटील, एस. एस. भस्मे, शेखर शहा, अजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

---------------
49792
‘माई’च्या अध्यक्षपदी डॉ. मिठारी
इचलकरंजी : मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीच्या (माई) अध्यक्षपदी डॉ. शरद मिठारी यांची निवड केली. डॉ. राजेश चिप्रे व डॉ. मंदार देशपांडे यांची उपाध्यक्षपदी, तर कार्यवाहपदी डॉ. राजेश कुंभार यांची नियुक्ती केली. मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीची सर्वसाधारण सभा डाळ्या सभागृहामध्ये झाली. अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब लांडे होते. २०२२-२३ साठी कार्यकारणी जाहीर केली. डॉ. राजेंद्रकुमार गाट यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. ए. के. चौगुले, डॉ. सदानंद देशपांडे व डॉ. दीपक जोशी यांनी माई आधार केंद्राचा अहवाल सादर केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96115 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..