हिंदु युवा प्रतिष्ठान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदु युवा प्रतिष्ठान
हिंदु युवा प्रतिष्ठान

हिंदु युवा प्रतिष्ठान

sakal_logo
By

अंबाबाईच्या दर्शनाला पैसे कशासाठी
हिंदू युवा प्रतिष्ठान; भाविकांना स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी पहिल्यांदा द्या
कोल्हापूर, ता. १४ ः नवरात्रोत्सव काळात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी दोनशे रुपयांच्या ‘ई-पास’ची नवी टूम काढली असून, देवीच्या दर्शनाला पैसे कशासाठी, असा सवाल हिंदू युवा प्रतिष्ठानने पत्रकाद्वारे केला आहे.
देवस्थानने नवरात्रात २०० रुपयांचा ई-पास देण्याची घोषणा केली आहे. याबाबत प्रतिष्ठानने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. मुळात कोरोनाच्या उत्तरार्धात मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर ई-पास प्रणाली राबवली गेली. ती काहीअंशी यशस्वी झाली असली तरी त्यामध्येही काही गोलमाल झाल्याचे उघड झाले होते. त्यावेळी ई-पास सेवा मोफत होती. आता मात्र त्यासाठी २०० रुपये आकारले जाणार आहेत. हे पैसे का आकारले जातात, असा सवाल या पत्रकात केला आहे.
नवरात्रात मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या काही लाखांत असते. शिवाजी चौकापर्यंत दर्शन रांग लागलेली असते. या रांगेत भाविकांना किमान दोन ते तीन तास उभे राहावे लागते. यात काही लोकांचेच उखळ पांढरे होणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी सुविधांची वानवा आहे. या सुविधाही देवस्थान समिती देत नाही. त्यामुळे अशा वादग्रस्त प्रथा पाडून विनाकारण मंदिराचा ‘आखाडा’ बनवू नये. भाविकांना निःशुल्क ई-पास द्यावा, पैसे घेण्यास प्रतिष्ठानचा विरोध असल्याचे पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर अशोक देसाई, प्रकाश घाटगे, राजेंद्र सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96122 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..