शुन्य शिक्षकी शाळांत कंत्राटी शिक्षक नेमणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शुन्य शिक्षकी शाळांत कंत्राटी शिक्षक नेमणार
शुन्य शिक्षकी शाळांत कंत्राटी शिक्षक नेमणार

शुन्य शिक्षकी शाळांत कंत्राटी शिक्षक नेमणार

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

५०१६५


शून्य शिक्षकी शाळांत कंत्राटी शिक्षक
प्रशासक चव्‍हाण यांची ग्‍वाही; प्रा. आबिटकर, मगदूम यांच्या निवेदनानंतर कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १५ : जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या रिक्‍त जागांची संख्या बरीच आहे. ही रिक्‍त पदे मोठ्या प्रमाणात दुर्गम भागात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्‍हा परिषदेच्या शून्य शिक्षकी शाळेत कंत्राटी शिक्षक भरण्याचा प्रस्‍ताव सादर करावा व त्यासाठी वित्त विभागाने आर्थिक तरतूद करावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी केली. जिल्‍हा परिषदेचे माजी सदस्य व जिल्‍हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
प्राथमिक शिक्षण विभागाकडील ७५० पदे रिक्‍त आहेत. बहुतांश रिक्‍त पदे दुर्गम भागातच आहेत. त्यामुळे या भागातील मुलांचे नुकसान होत आहे. शासनाकडून शिक्षक भरतीबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे या शाळांचे व विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शालेय व्यवस्‍थापन समित्यांकडूनही शिक्षक भरतीची मागणी होत होती. याबाबत आज प्रा. आबिटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्‍हाण यांना निवेदन दिले. दुर्गम भागातील शिक्षणात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. यावर श्री. चव्‍हाण यांनी तत्‍काळ प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे व मुख्य वित्त व लेखाधिकारी व्‍ही. टी. पाटील यांना कंत्राटी शिक्षक भरतीची फाईल सादर करण्याचे आदेश दिले.
वित्त विभागाने, शिक्षक भरण्यात तांत्रिक अडचणींचा मुद्दा उपस्‍थित केला. यावर शिक्षक भरायचेच आहेत. शिक्षण महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे कोणीही त्रुटी काढल्या तरी त्याचा विचार न करता फाईल सादर करावी, असे श्री. चव्‍हाण यांनी वित्त अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर मात्र कंत्राटी शिक्षक नेमणुकीबाबत हालचाली सुरू झाल्या.

कोट
जिल्‍ह्यात शून्य शिक्षकी सर्वाधिक शाळा या भुदरगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, पन्‍हाळा, गगनबावडा या तालुक्यात आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे येथे मानधन तत्त्वावर शिक्षक नेमणे आवश्यक आहे. शक्‍यतो शिक्षक नेमताना त्या भागातीलच मुलांना प्राधान्य द्यावे. जेणेकरुन जवळच्या शाळेत शिकवणे शक्य होईल. शिक्षकाची गुणवत्ता पाहून मगच नेमणूक द्यावी.
- प्रा. अर्जुन आबिटकर, माजी जिल्‍हा परिषद सदस्य

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96137 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..