रशिया आण्णा भाऊ साठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रशिया आण्णा भाऊ साठे
रशिया आण्णा भाऊ साठे

रशिया आण्णा भाऊ साठे

sakal_logo
By

50151
मास्को (रशिया) ः येथील मार्गारिटा रुडमिनो ऑल रशियन स्टेट लायब्ररी फॉर लिटरेचरच्या आवारात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करताना देवेंद्र फडणवीस. शेजारी राहुल नार्वेकर, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. पॉवेल, बळीराम गायकवाड, संजय देशपांडे आदी.

अण्णा भाऊंचा मास्कोतील
अर्धपुतळा अभिमानास्पद
देवेंद्र फडणवीस, शानदार समारंभात अनावरण

डी. आर. पाटील ः सकाळ वृत्तसेवा
मास्को (रशिया), ता. १४ ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा रशियात उभा राहणे आणि त्यांचा गौरव होणे, ही भारताबरोबरच महाराष्ट्रासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मास्कोमधील मार्गारिटा रुडमिनो ऑल रशियन स्टेट लायब्ररी फॉर लिटरेचरच्या आवारात उभारलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, मार्गारिटा रुडमिनो ऑल रशियन स्टेट लायब्ररी फॉर लिटरेचरचे प्रमुख पॉवेल कझमीन आदी प्रमुख उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र, विद्यापीठाचे सेंट्रल युरेशियन स्टडीज डिपार्टमेंट यांच्या पुढाकाराने त्याचबरोबर मार्गारिटा रुडमिनो ग्रंथालयाच्या सहकार्याने हा सोहळा झाला.
फडणवीस म्हणाले, ‘‘अण्णा भाऊ साठे यांनी जीवनाचे वास्तव साहित्यातून मांडले. त्यांचे साहित्य संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती चळवळीसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या साहित्यावर आजही रशिया प्रेम करतो. त्यांचे साहित्य येथे अभ्यासले जाते, याचा अभिमान आहे. त्यांचे शिल्प येथे उभारले जाते. तेही भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात व भारत-रशिया राजनैतिक संबंधालाही ७५ वर्षे पूर्ण होत असताना, ही अभिमानाची गोष्ट आहे.’’
या वेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘ही अभिमानाची गोष्ट आहे म्हणूनच महाराष्ट्र विधानसभेमध्ये मार्गारिटा रुडमिनो लायब्ररीच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. अण्णा भाऊंच्या साहित्याने समाज परिवर्तनाचे काम केले आहे.’’ डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले, ‘‘अण्णा भाऊंचे साहित्य संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खूप महत्त्वाचे आहे. मानवता, एकता ही सूत्रे त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित होतात. अण्णा भाऊ लेखक आणि समाज सुधारक म्हणून तितकेच ताकदीचे होते. कारण त्यांच्या साहित्याला भाषा, देश अशा कोणतीही सीमा नव्हत्या, म्हणूनच ते रशियामध्ये प्रसिद्ध पावले.’’
मुंबई येथील अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. बळीराम गायकवाड यांनी स्वागत केले. मुंबई विद्यापीठाच्या सेंट्रल युरेशियन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. संजय देशपांडे, मिलेनियम चेंबर ऑफ कॉमर्सचे सुनील वारे, जेएनयू विद्यापीठाच्या रशियन अध्यक्ष केंद्राचे प्रमुख सोनू सैनी, आनंद कांबळे, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठाच्या हिंदी अध्ययन केंद्राच्या प्रमुख खाकरोव्ह यांनी आभार मानले.

३४ वा पुतळा अण्णा भाऊंचा
मास्कोमधील प्रसिद्ध अशा या ग्रंथालयाच्या प्रांगणामध्ये एकूण ३३ पुतळे आहेत. यामध्ये महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, पोप जॉन पॉवेल द्वितीय अशा दिग्गजांचा समावेश आहे. याच पंक्तीत आता अण्णा भाऊंचा अर्धाकृती पुतळा विराजमान झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96152 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..