शनिवारी स्वच्छता मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवारी स्वच्छता मोहीम
शनिवारी स्वच्छता मोहीम

शनिवारी स्वच्छता मोहीम

sakal_logo
By

ऐतिहासिक स्थळांची
शनिवारी स्वच्छता
कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्र शासनाकडून १७ ते २ ऑक्टोबर कालावधीत इंडियन स्वच्छता लीग राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शनिवारी (ता. १७) शहरातील प्रेक्षणीय स्थळे, रंकाळा तलाव परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, पंचगंगा नदी घाट येथे कचरामुक्त शहराबाबत रॅली व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. आरोग्य निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, केएमसी कॉलेजकडील विद्यार्थी व शिक्षक, वृक्षप्रेमी वेल्फेअर, व्हाईट आर्मी, थुंकीमुक्त कोल्हापूरचे कार्यकर्ते, जनसंघर्ष सेना, स्वरा फाउंडेशन, अवनि संस्था व क्रिडाई संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरातील नागरिकांनी, तालीम संस्था, सार्वजनिक मंडळांनी मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96160 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..