उद्योजक अधिकारी बैठक -आ.सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योजक अधिकारी बैठक -आ.सतेज पाटील
उद्योजक अधिकारी बैठक -आ.सतेज पाटील

उद्योजक अधिकारी बैठक -आ.सतेज पाटील

sakal_logo
By

५०१६७

कर घेता; मग सोईसुविधा द्या
आमदार सतेज पाटील; औद्योगिक वसाहतीतील गैरसोयीचा वाचला पाढा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः औद्योगिक वसाहतीत स्वच्छता झाली पाहिजे, औद्योगिक विकास महामंडळ आणि ग्रामपंचायती पन्नास पन्नास टक्के कर घेत असतील तर त्यांनी सुविधा देण्यासाठी कारणे सांगू नयेत, अशा स्पष्ट सूचना आज माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. औद्योगिक वसाहतीत सुधारणा करताना उद्योजकांच्या असोसिएशनशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरवावा, असेही स्पष्ट केले. धोरणात्मक निर्णयाबाबंतही अधिकारी, उद्योजकांची मते जाणून घेत शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्‍वाही पाटील यांनी दिली. प्रत्येक तीन महिन्यांनी आढावा बैठक घेणार असल्‍याचेही येथे जाहीर केले.
बैठकीस आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह ज्येष्ठ उद्योजक आयआयएफचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, इंजिनिअरिंग असोसिएशन हर्षद दलाल, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह सुमारे ३०हून अधिक उद्योजक आणि २० अधिकारी उपस्थित होते. इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये साडेतीन तास ही बैठक चालली.
प्रत्येक ग्रामपंचायतीकडून औद्योगिक क्षेत्रास वेगवेगळा घरफाळा आकारला जातो. एमआयडीसीसुद्धा पन्नास टक्के कर आकारते. मात्र स्वच्छता कोणीही करीत नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली. या वेळी जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनीही कचरा उठावाचे काम एमआयडीसीने करण्याचे परिपत्रक असल्याचे सांगितले. आमच्याकडे देखभाल दुरुस्ती असल्याचे सांगून त्यामध्ये कचरा उठाव येत नसल्याचे मत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावर वरिष्ठांकडून स्पष्टीकरण घ्या, पण कचरा उठाव झालाच पाहिजे, असे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. प्रत्येक ग्रामपंचायत वेगवगेळा घरफाळा वसूल करते. तो एकच असावा, क्षेत्रावर आधारित असावा, अशी मागणी उद्योजकांनी केली. यावर घरफाळा ठरविण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. त्यामुळे त्यांनी सांगेल तितका घरफाळा द्यावा लागेल, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. यावर उद्योजकांनी द्यायला हरकत नाही, मात्र तो सर्वासाठी एकच असावा, अशी मागणी केली. एमआयडीसीसह ग्रामपंचायतींनीही औद्योगिक वसाहतील नागरी सुविधा द्याव्यात अशी भूमिका घेतली. एमआयडीसीने जितका महसूल वसाहतीतून जमा केला आहे तो तेथेच खर्च करावा, अशाही सूचना पाटील यांनी दिल्या.

विविध विषयांवर चर्चा
टोप संभापूर येथील प्रस्तावित वसाहतीस विजेचा ट्रान्स्फॉर्मर स्वतंत्र द्यावा, सोलर रुफबाबतची पॉलिसी निश्‍चित करावी, औद्योगिक वसाहतीत पोलिसांची गस्त वाढवावी, रुपांतरीत कराची, हस्तांतराची कामे तातडीने करावीत, ईएसआयकडून प्रलंबित बिले द्यावीत, औद्योगिक वसाहतीतील ‘ओपीडी’ शनिवार, रविवारी सुरू ठेवावी, विकासवाडी येथील करवीर औद्योगिक वसाहतीचे काम तातडीने सुरू करावे, एमआयडीसीचे प्लॉट हस्तांतराची प्रक्रिया गतिमान करावी, शहरात फायर सेस अपडेट व्हावा यांसह अन्य मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96191 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..