न्यू हायस्कूलमध्ये कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू हायस्कूलमध्ये कार्यक्रम
न्यू हायस्कूलमध्ये कार्यक्रम

न्यू हायस्कूलमध्ये कार्यक्रम

sakal_logo
By

हिंदी दिन

50195
कोल्हापूर : न्यू हायस्कूलमध्ये हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पणप्रसंगी उपस्थित मान्यवर.

न्यू हायस्कूलमध्ये हिंदी दिन
कोल्हापूर : न्यू हायस्कूलमध्ये हिंदी दिन साजरा झाला. साहित्यिक प्रेमचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. एन. एम. गोसावी यांनी स्वागत केले. एस. एस. मेटल यांनी ‘हिंदी भाषा का महत्त्व प्रचार आणि प्रसार’ याविषयी माहिती सांगितली. मुख्याध्यापक के. ई. पवार, एस. जे. पाटील, पी. एच. पोवार, वाय. एस. पोवार उपस्थित होते. पर्यवेक्षिका एस. आर. पाटील यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. रेडिओवरील ‘बिनाका गीतमाला’ची आठवण करून दिली. हिंदी विभागप्रमुख पी. आर. पाटील यांनी ‘बुरी संगत का असर’ यावर विचार व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाबद्दल कविता, भाषणे सादर केली. डी. आय. गुजर यांनी आभार मानले. एस. बी. गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

आदर्श प्रशालेत हिंदी दिन
कोल्हापूर ः सरनाईक कॉलनी येथील आदर्श प्रशालेत हिंदी दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे सर्पमित्र धनंजय नामजोशी यांचे स्वागत आर. वाय. पाटील यांनी केले. हिंदी दिनाचे महत्त्व डी. पी. सुतार यांनी विषद केले. नामजोशी यांनी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत बोलण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. हिंदी ही आपली राजभाषा असून अनेकांना रोजीरोटी देणारी भाषा आहे, असेही नमूद केले. एस. एस. शिंदे यांनी आभार मानले.


कसबा बीड महिला महाविद्यालय
कसबा बीड ः येथील महिला महाविद्यालयात हिंदी दिन साजरा झाला. १४ सप्टेंबर हा हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुचिता भोसले होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले. पूजा शिलेदार, गौरी कांबळे, स्वराली लांडगे, स्नेहल पाटील, गौरी मुळीक, साक्षी पाटील, अनुराधा देशमुख यांनी हिंदी भाषेतील देशभक्तिपर कविता, हिंदी घोषवाक्ये, चुटुकले व मुहावरे सादर केले. यावेळी डॉ. वैशाली सामंत उपस्थित होत्या. स्वराली लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. पूजा शिलेदार यांनी आभार मानले.

शुभंकरोती, कर्मवीर स्कूलमध्ये हिंदी दिन
सानेगुरुजी वसाहत ः फुलेवाडी रिंग रोडवरील शुभंकरोती प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी दिन साजरा झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका जयश्री गुरव होत्या. यानिमित्त कविता, गायन व हस्ताक्षर स्पर्धा झाल्या. स्नेहल गायकवाड यांनी स्वागत केले. भूमी शेळके, प्रतिक जाधव, हिंदी विषय प्रमुख विशाल भोरे यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन हिंदी विषय प्रमुख विशाल भोरे यांनी केले. निर्मला थापा यांनी सूत्रसंचालन केले. प्रणाली कोळेकर हिने आभार मानले. संस्था समन्वयक ज्योती लगारे, पर्यवेक्षक चौगुले, पर्यवेक्षक पूनम मुसळे, समन्वयक अश्विनी पाटिल, रुपाली निकाडे, सेजल तराळे, शुभांगी दमे, सुरेखा काशीद, सुहासिनी कुंभार, अमृता ताटे, रसिका पोतदार, श्वेता प्रभावळकर, लता नायर, सपना खोराटे, रुपाली डोणे, मनीषा पाटील, सीमा किल्लेदार, वैभव लोखंडे, संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले.

देशमुख हायस्कूल
सानेगुरुजी वसाहत : येथील देशमुख हायस्कूलमध्ये १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे, काव्यवाचन, नाटिका याद्वारे हिंदी दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. यू. जाधव होते. हिंदी विषय प्रमुख पी. जे. साळुंखे, एस. आर. पाटील, एम. एस. दुधाळ, डोंगरे, कांबळे उपस्थित होते.

आंबुबाई पाटील इंग्लिश स्कूल
उजळाईवाडी ः गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हिंदी दिन साजरा झाला. केंद्र प्रमुख एम. जी. नणवरे, टी. बी. काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचा सत्कार प्राचार्य के. डी. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी नणवरे, काटे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी ही देशातील सर्वाधिक ठिकाणी बोलली जात असून देश एकसंध राखण्यात हिंदी भाषेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, देशभक्तिपर हिंदी कविता, भाषण, हिंदी नाटिका सादर केल्या. यावेळी शकुंतला पाटील, मनीषा पाटील, सीमा पाटील, मनीषा बनसोडे, शीतल गुरव, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

तेजस मुक्त विद्यालय
सानेगुरुजी वसाहत ः तेजस मुक्त विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा झाला. मुख्याध्यापिका एस. पी. साळोखे अध्यक्षस्थानी होत्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव देशमुख, सुनील कुरणे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून, नाट्यीकरणाचे सादरीकरण केले. व्याख्यात्या सौ. डी. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशिता चिले हिने स्वागत केले. वैष्णवी अतिग्रे हिने सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एस. इंगळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डी. व्ही. पाटोळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96195 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..