सुभाष स्टोअरप्रकरणी पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाष स्टोअरप्रकरणी पत्र
सुभाष स्टोअरप्रकरणी पत्र

सुभाष स्टोअरप्रकरणी पत्र

sakal_logo
By

भरपाई रकमेबाबत मनपाकडून
‘प्रदूषण नियंत्रण''ला विचारणा

कोल्हापूर, ता. १४ ः सुभाष स्टोअरमधून झालेल्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय भरपाईसाठी काढलेली २ कोटी २८ लाखांची रक्कम कशा आधारे निश्‍चित केली, याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी महापालिकेने मंडळाला पत्राद्वारे केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश व मंडळाचे पत्र यात फरक असल्याने त्याची स्पष्टता करण्यासाठी पत्र दिले. सुभाष स्टोअर यंत्रशाळेतून प्रदूषण होत असल्याबाबत लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार सुनावणी होऊन त्याबाबत पर्यावरणीय भरपाईची रक्कम निश्‍चित करण्याचे आदेश मंडळाला दिले होते. त्यानुसार मंडळाने २ कोटी २८ लाखांची रक्कम निश्‍चित केली. तसे पत्र महापालिकेला पाठवले. त्यात ही रक्कम भरावी, असे सांगितले होते. लवादासमोर अजून सुनावणी सुरू आहे, भरपाईची रक्कम त्यांनी निश्‍चित केलेली नसताना मंडळाने रक्कम भरण्याचे पत्र दिल्याने महापालिका संभ्रमावस्थेत सापडली होती. महापालिकेने त्याबाबत मंडळाला विचारणा करायची ठरवले होते. दरम्यान गणेशोत्सव असल्याने ते पत्र दिले नव्हते. महापालिकेने ते पत्र मंडळाकडे पाठवले असून त्यांच्याकडून खुलासा काय येतो, त्यावर पुढे काय करायचे हे महापालिका ठरवणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96203 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..