समाजशास्त्र कार्यशाळा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजशास्त्र कार्यशाळा बातमी
समाजशास्त्र कार्यशाळा बातमी

समाजशास्त्र कार्यशाळा बातमी

sakal_logo
By

50200

समाजशास्त्रातून समाजाचे सक्रिय सेवक
प्रा. कुमार; विद्यापीठाच्या हीरक महोत्सवानिमित्त व्याख्यान

कोल्हापूर, ता. १४ ः समजाशास्त्र शिकल्याने आपण समाजाचे सक्रिय सेवक बनतो, असे मत समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. आनंद कुमार यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ‘इंडिया बिटवीन ग्लोबल अँड डी ग्लोबलायजेशन’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे अध्यक्षस्थानी होते.
प्रा. कुमार यांनी विविध क्षेत्रांतील जागतिकीकरण कसे झाले?, जागतिकीकरणाचा समाजातील प्रत्येक घटकावर कसा प्रभाव पडतो, यावर प्रकाश टाकला आणि यालाच जोडून अ-जागतिकीकरण संकल्पना काय आहे?, सामाजिक-आर्थिक क्षेत्रात जागतिकीकरणाच्या विरोधात राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे येत आहे. जागतिकीकरण हे सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक बाबतीत पुढे येत असेल तर त्याचा अ-जागतिकीकरणातून विरोध होत आहे, असे विचार मांडले. गोवा विद्यापीठाचे डॉ. अरविंद हळदणकर, कोमल ओसवाल, अभिजित पाटील, आकाश ब्राम्हणे आदी उपस्थित होते. डॉ. प्रतिमा पवार यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख डॉ. प्रल्हाद माने करून दिली. डॉ. प्रतिभा देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96216 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..