वार्षिक सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्षिक सभा
वार्षिक सभा

वार्षिक सभा

sakal_logo
By

अंबाबाई दूध संस्थेची वार्षिक सभा
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील अंबाबाई दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. कोदवडेचे कृष्णात पाटील अध्यक्षस्थानी होते. सभेत कायमस्वरूपी वाढीव बोनस देण्याची प्रथा कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचक्रोशीत कायमस्वरूपी अधिक बोनस देण्याची संस्थेची प्रथा आहे. सचिव दिलीप पाटील यांनी अहवाल वाचन केले. बाजीराव महाडेश्वर यांनी आभार मानले. सभेला संस्थापक अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. दिगंबर महाडेश्वर, आनंदा कानुगडे, निखिल पाटील, शहाजी महाडेश्वर, दत्तात्रय सरवळकर, निवास लोहार, नंदकुमार लोहार, सुनील पाटील, जयवंत गौड उपस्थित होते.

50100
परशुराम विद्यामंदिरात हिंदी दिन
गगनबावडा ः येथील परशुराम विद्यामंदिरत हिंदी दिन साजरा झाला. विद्यालयात हिंदी भाषेतील काव्यलेखन, निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा कशी समृद्ध आहे, याबाबत मनोगत व्यक्त केले. प्राचार्य रंगराव गोसावी अध्यक्षस्थानी होते. हिंदी शिक्षक दीपक पाटील व शीतल पत्रावळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. संजना पाटील या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले. या वेळी शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

3234
अध्यक्षपदी दत्तात्रय लवटे
पुनाळ : जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या विज्ञान विषय समितीच्या अध्यक्षपदी ज्योतिर्लिंग हायस्कूलचे (बोरगाव) मुख्याध्यापक दत्तात्रय लवटे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी अशी ः कार्यवाह सचिव- निवास फराकटे, आर. डी. पिष्टे, सहकार्यवाह- पी. ए. पाटील, अनंत भोगन, टी. टी. सुतार, ए. बी. दिवटे. संघाचे सचिव दत्ता पाटील, संघ प्रतिनिधी प्रकाश पोवार यांच्या उपस्थितीत निवडी झाल्या. रामराव इंगवले हायस्कूलच्या (हातकणंगले) मुख्याध्यापिकापदी एस. एम. ‌पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी एस. एस. हजारे, ओंकार कुलकर्णी, महेश नेर्लेकर, भरत कतकर, एम. आर. पाटील, श्रीकांत चव्हण, श्री. माळकर उपस्थित होते.

01791
आर. आर. खडके ॲकॅडमीत हिंदी दिन
बोरपाडळे : येथील आर. आर. खडके फाउंडेशन संचलित पन्हाळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, आई विद्यानिकेतन आणि शर्विल खडके हायस्कूल आदी संस्थांमध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. उपप्राचार्या रश्मी पोवार यांनी प्रास्ताविक केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र चौगुले अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थी भाषणे, समूहगान, वेशभूषा आणि सांस्कृतिक नृत्याचा आविष्कार झाला. प्रमुख पाहुणे संस्थापक प्राचार्य अविनाश खडके यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हिंदी राष्ट्रभाषेचे महत्त्व याबद्दल सुलक्षणा मोरे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या क्रांती खडके, प्रा. मुरलीधर लोहार, उपप्राचार्या अयोध्या पाटील आदींची उपस्थिती होती.

03891
गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार
जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथील जिनगोंडा बाळगोंडा पाटील हायस्कूलमध्ये एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार करण्यात आला. राजगोंडा पाटील अध्यक्षस्थानी होते. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी सृष्टी शिंत्रे, विनीत कांबळे, श्वेता मोहिते, अथर्व घोलप, श्रुती मोहिते, गौरव मोहिते, किरण परब, श्रेया पोवार, श्रेणिक ढवळे यांना तीन लाख ६४ हजार ८०० रुपये शिष्यवृत्ती मिळाली. विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक एस. एल. चिगरे, पर्यवेक्षक पी. ए. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कुणाल कांबळे यांनी शिल्ड व वृक्ष भेट दिली. राजगोंडा पाटील, अभय पाटील, अशोक मगदूम, बापूसो नांद्रेकर, भरत कांबळे, मायाजीराव बेडगे, शरद कांबळे, सुनील पवार, धनपाल शिंगे आदी उपस्थित होते. एस. एस. गावडे यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. गावडे यांनी आभार मानले.

49793
पूर्वा शेवाळेची निवड
इचलकरंजी : मुंबई येथे झालेल्या ३६ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप धावणे स्पर्धेत १८ वर्षे खालील वयोगटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पूर्वा शेळके हिने रौप्यपदक पटकावले. तिची छत्तीसगड येथे होणाऱ्या वेस्टर्न झोन नॅशनल चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, राजगोपाल डाळ्या, बाबासाहेब वडिंगे, मारुतराव निमणकर यांनी पूर्वाचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, आर. एस. पाटील, एस. एस. भस्मे, शेखर शहा, अजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

नाट्य स्पर्धेत सुळे शाळेचे यश
माजगाव : वाघवे येथे झालेल्या तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत यशवंत माध्यमिक विद्या मंदिर सुळे शाळेने द्वितीय क्रमांक पटकाविला. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक व ग्रामीण साहित्यिक संतोष फिरिंग यांनी केले. श्रुतिका पाटील, गौरी पाटील, सोनाली पाटील प्रतिज्ञा वाकरेकर, प्रार्थना पाटील, पियुष शिर्के, सिद्धांत कांबळे यांनी सहभाग घेतला होता.
संस्थेचे अध्यक्ष डी. जी. पाटील, मुख्याध्यापक यु. बी. आंबुपे, डी. आर. बाडकर, अशोक मानकर, विजया सनगर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96242 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..