बीएसएनएल ग्राहक कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएसएनएल ग्राहक कार्यशाळा
बीएसएनएल ग्राहक कार्यशाळा

बीएसएनएल ग्राहक कार्यशाळा

sakal_logo
By

50212

कोल्हापूर ः बीएसएनएलच्या ग्राहक शाळेचे उद्‌घाटन करताना प्रा. डॉ. रूपा शहा. सोबत उपसरव्यवस्थापक अनघा भोसले, स्नेहा विचारे, श्री. देशमुख.

बीएसएनएलच्या सुविधा
ग्राहकांपर्यंत पोचवणार
---------
टेलिफोन भवनमध्ये ग्राहक कार्यशाळेत अधिकाऱ्यांची ग्वाही

कोल्हापूर, ता. १५ः ‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या ग्राहकांच्या अडीअडचणी जाणून अत्याधुनिक सोयीसुविधा ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी तत्पर राहू, अशी ग्वाही ‘बीएसएनएल’च्या कोल्हापूर मंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. टेलिफोन भवनमध्ये ग्राहक कार्यशाळा झाली. दिलासा संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रूपा शहा यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. प्रा. डॉ. शहा म्हणाल्या, ‘‘भारत संचार निगम लिमिटेडच्या नवनवीन सोयी सुविधांची माहिती ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी ग्राहक कार्यशाळा व ग्राहक मेळावे आयोजित करावे. माहिती पत्रके तसेच पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देणे महत्त्‍वाचे ठरेल.
कार्यशाळेत ग्राहकांतर्फे जिल्हा बँक, घाटगे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, विवेकानंद शिक्षण संस्था, पोस्ट कार्यालय, सिद्धगिरी मठ अशा विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी अडचणी मांडल्या. बीएसएल कोल्हापूर मंडलचे सरव्यवस्थापक अरविंद पाटील, उपसरव्यवस्थापक अनघा भोसले, स्नेहा विचारे यांनी उत्तरे दिली. जान्हवी काळे, संतोष कातवरे, सतीश जोशी यांनी फायबर केबलच्या माध्यमातून सेवेचे फायदे, ग्रामपंचायत जोडण्याची योजना, टेलिफोन सेवेच्या माध्यमातून जिंगल्सच्या स्वरूपात जाहिरात किंवा सर्वेक्षणासाठी केली जाणारी दरआकारणी, कॉन्फरन्स सुविधांची माहिती दिली. उपसरव्यवस्थापक व्ही. बी. देशमुख, प्रताप पाटील, विजयानंद माने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96254 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..