लम्‍पीचा प्रसार रोखण्यासाठी फवारणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्‍पीचा प्रसार रोखण्यासाठी फवारणी करा
लम्‍पीचा प्रसार रोखण्यासाठी फवारणी करा

लम्‍पीचा प्रसार रोखण्यासाठी फवारणी करा

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

कीटकनाशक फवारणीद्वारे
लम्‍पीस्कीनचा प्रसार रोखा
मुख्य कार्यकारी अधिकारी चव्‍हाण यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १५ : राज्यात अनेक जिल्‍ह्यात जनावरांना लम्‍पीची लागण होत आहे. हा आजार विषाणूजन्य असून संसर्गजन्य आहे. रोगाचा प्रसार माशा, डास, गोचिड, चिलटे व बाधित जनावरांच्या संपर्कातून होत आहे. त्यामुळे गावागावांत प्रतिबंधात्‍मक फवारणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी ग्रामपंचायतींना केली आहे.
लम्‍पीच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्‍न करत आहे. बाधित जनावरांचे लसीकरण सुरू आहे. मात्र तेवढ्यावर न थांबता ग्रामपंचायतींनी प्रतिबंधात्‍मक फवारणी करणे आवश्यक आहे. कोरोनाची लागण झाली होती तेव्‍हा गावागावांत अशी फवारणी झाली होती. आताही ग्रामपंचायतीने नियोजन करणे आवश्यक आहे. याचाच भाग म्‍हणून गोठ्यांमध्ये सोडियम हायड्रोक्‍लोराईड २ ते ३ टक्‍के द्रावण, फिनेल २ टक्‍के किंवा फर्मोलीन १ टक्‍केची फवारणी करणे आवश्यक आहे. गावामध्येही कीटकनाशकांची फवारणी आवश्यक आहे. याचबरोबर गावांमध्ये पशुपालकांना दवंडी, ग्रामवाहिनी या माध्यमातून लम्‍पीबाबत जागृत करावे, असे आवाहन श्री. चव्‍हाण यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96300 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..