बुगडीकट्टीत अंगणवाडी इमारत बांधकामास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुगडीकट्टीत अंगणवाडी इमारत बांधकामास प्रारंभ
बुगडीकट्टीत अंगणवाडी इमारत बांधकामास प्रारंभ

बुगडीकट्टीत अंगणवाडी इमारत बांधकामास प्रारंभ

sakal_logo
By

50253
बुगडीकट्टी : गुडलकोपमध्ये अंगणवाडी इमारत बांधकाम प्रारंभप्रसंगी विद्याधर गुरबे, इंदूताई नाईक, दयानंद देसाई, मायाप्पा धनगर, मंगल देसाई, उत्तम नाईक आदी.

बुगडीकट्टीत अंगणवाडी
इमारत बांधकामास प्रारंभ
दुगूनवाडी, ता. १५ : बुगडीकट्टी पैकी गुडलकोप (ता. गडहिंग्लज) येथे अंगणवाडी इमारत बांधकामाचा प्रारंभ पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे व इंदूताई नाईक यांच्या हस्ते झाला. या अंगणवाडीसाठी गुरबे यांच्या प्रयत्नामुळे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी २४ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
बुगडीकट्टीपैकी गुडलकोप वसाहतीतील मुलांना अंगणवाडी इमारत नसल्याने गैरसोय होत होती. तेथे अंगणवाडी इमारतीची गरज ओळखून गुरबे यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार पाटील यांनी आपल्या निधीतून २४ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्या इमारतीचा बांधकाम प्रारंभ नुकताच झाला. दरम्यान, पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोगातून गुरबे व नाईक यांच्या निधीतून गावातील ५५४ कुटुंबीयांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. या वेळी गुरबे म्हणाले, ‘‘घर व परिसर स्वच्छ ठेवण्यात जशी महिलांची भूमिका महत्त्‍वाची असते, त्याप्रमाणे स्वच्छ, सुंदर गावासाठी महिलांनी सतर्क असण्याची आवश्यकता आहे. यापुढील कालावधीत गावच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही. विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहू.’’
या कार्यक्रमास सरपंच दयानंद देसाई, उपसरपंच मायाप्पा धनगर, रुद्राप्पा देसाई, जोतिबा हुबळे, माजी सरपंच मंगल देसाई, उत्तम नाईक, रामदास पाटील, ईश्‍वर पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच मायाप्पा धनगर यांनी स्वागत केले. कामाना नाईक यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96309 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..