स्वामी कॉलनीत सुविधा पुरवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी कॉलनीत सुविधा पुरवण्याची मागणी
स्वामी कॉलनीत सुविधा पुरवण्याची मागणी

स्वामी कॉलनीत सुविधा पुरवण्याची मागणी

sakal_logo
By

50262
गडहिंग्लज : स्वामी कॉलनीत सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देताना दिलीप माने, दिनकर दिवटे, नारायण फाळके, सदानंद डावरे आदी.

सकारात्मक उत्तरे, पण कार्यवाही शून्य
---
स्वामी कॉलनीतील प्रश्‍न; सुविधा पुरविण्याचे पालिकेला साकडे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : शहरातील स्वामी कॉलनीतील मूलभूत प्रश्‍नांसाठी पालिकेला वेळोवेळी साकडे घातले. मात्र, प्रशासनाकडून नेहमी गोड आणि सकारात्मक उत्तरे मिळत असली तरी कार्यवाही मात्र शून्य असते. यामुळे आजही ही कॉलनी विविध समस्यांनी त्रासली आहे. तत्काळ रस्ते, गटारींसह ओपन स्पेसची स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत पालिकेला निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. रिंग रोडलगतच्या या कॉलनीत दोन्ही बाजूंच्या गटारी नादुरुस्त आहेत. रस्ते इतके खराब आहेत, की सफाई कामगारांना नीट झाडूही मारता येत नाही. खड्ड्यांतून चालणेही मुश्कील झाले आहे. गटारी खराब झाल्याने सांडपाण्याचा निचरा थांबला. परिणामी, डासांची उत्पत्ती वाढली आहे. विविध आजारांना नागरिक बळी पडत आहेत. यामुळे गटर्सची सुधारणा महत्त्वाची आहे.
दिलीप माने व दिवटे यांच्या घरासमोरील रस्त्यात आरसीसी पाईप व्यवस्थित न बसविल्याने ते गाळाने भरलेले आहेत. गाळ काढून हे पाईप योग्य ठिकाणी टाकावे. ओपन स्पेसमधील खेळणी, जागेची नियमित सफाई नसल्याने झुडपांत दडली आहेत. यामुळे त्वरित कार्यवाही करून ही जागा खेळण्यायोग्य करावी. दुसऱ्या ओपन स्पेसमध्ये झुडपे व वनस्पती वाढल्या आहेत. वृक्षारोपणासाठी मारलेल्या खड्ड्यात पालापाचोळा व पाणी साठल्याने दुर्गंधी सुटली आहे. वृक्षारोपणाला विरोध असल्याने खड्डे तत्काळ बुजवावेत आणि औषध फवारणी करावी. माजी नगरसेवक दिलीप माने, दिनकर दिवटे, सदानंद डावरे, प्रभावती पाटील, पांडुरंग हरेर, गणपती मांगले, डॉ. राकेश चौगुला, विकास पोवार, ओंकार माने, नारायण फाळके, बसवराज पाटील, कृष्णा पाटील आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96321 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..