श्री शिवछत्रपती पतसंस्थेस २१ लाख नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री शिवछत्रपती पतसंस्थेस २१ लाख नफा
श्री शिवछत्रपती पतसंस्थेस २१ लाख नफा

श्री शिवछत्रपती पतसंस्थेस २१ लाख नफा

sakal_logo
By

01701
सुरुते : सभासदांचा सत्कार करताना व्ही. के. गावडे. शेजारी टी. एस. चांदेकर व इतर.

श्री शिवछत्रपती पतसंस्थेस २१ लाखांचा नफा
चंदगड, ता. १५ : सुरुते (ता. चंदगड) येथील श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांच्या पतसंस्थेस गेल्या आर्थिक वर्षात २१ लाख रुपयांचा नफा झाला. संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. मुख्याध्यापक मधुकर सुतार अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. के. गावडे यांनी प्रास्ताविक केले. सचिव एस. बी. भोसले यांनी अहवाल वाचन केले. सभासदांचा विश्‍वास, कर्जदारांकडून वेळेत भरले जाणारे हप्ते यामुळे अल्पावधीत चांगली प्रगती झाल्याचे सांगण्यात आले. सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याचे ठरले. गुणवंत विद्यार्थी श्रेया धायगुडे, तेजस बेरडे, संस्कार माने, अस्मिता माडखोलकर, वैष्णवी पाटील, भूमिका निकम, अथर्व सावंत, समर्थ खोराटे, सायली पाटील, साक्षी नंद्याळकर, आदित्य बिर्जे, श्‍लेषा कमलाकर, हर्षदा कोले, कृष्णाई पवार, रुद्र पाटील, मधुरा बोकडे, श्रीधर माने, आदित्य बोकडे, जान्हवी पाटील यांच्यासह शिक्षक रवींद्र पाटील, बसवंत चिगरे, मनोहर भुजबळ यांचा सत्कार झाला. सुरुते शाळेला जिल्हास्तरीय स्वच्छ सुंदर शाळेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मधुकर सुतार व सहकाऱ्यांचा सत्कार झाला. निवृत्त सभासद सातवणेकर, सुरेश तुर्केवाडकर, पी. बी. चौगुले, पी. एफ. कांबळे, पी. एन. कालकुंद्रीकर यांचाही सत्कार झाला. टी. टी. बेरडे यांनी सूत्रसंचालन केले. टी. एस. चांदेकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96357 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..