गायींना प्राधान्याने लस देणार : अंजना रेडेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायींना प्राधान्याने लस देणार : अंजना रेडेकर
गायींना प्राधान्याने लस देणार : अंजना रेडेकर

गायींना प्राधान्याने लस देणार : अंजना रेडेकर

sakal_logo
By

गायींना प्राधान्याने लस
देणार : अंजना रेडेकर
गडहिंग्लज, ता. १५ : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील पशुधनासाठी गोकुळ दूध संघातर्फे मोफत २० हजार लम्पी प्रतिबंधक लस उपलब्ध केल्याची माहिती संचालिका अंजना रेडेकर यांनी पत्रकातून दिली आहे. गायींना प्राधान्याने ही लस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेडेकर म्हणाल्या, की लम्पी त्वचारोगाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. अनेक जनावरे त्याला बळी पडत आहेत. यासाठी पशुपालकांनी गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यात डास, माशा, गोचिड निर्मूलनासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. सायंकाळच्या वेळी गोठ्यात कडुलिंबाच्या पाल्याचा धूर करावा, हवा खेळती ठेवण्याचे आवाहन केले आहे.
‘गोकुळ’तर्फे सर्व जनावरांना मोफत लस देण्यात येणार आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तिन्ही तालुक्यांसाठी २० हजार लशी ‘गोकुळ’ने उपलब्ध केल्या आहेत. ही प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील पशुपालकांनी डॉ. अविनाश जोशी, आजरा तालुक्यासाठी डॉ. लोखंडे आणि चंदगड तालुक्यासाठी डॉ. टापरे व डॉ. परगणे यांच्याशी संपर्क साधावा. गडहिंग्लज उपविभागात अद्याप या आजाराचा संसर्ग झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यां‍नी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. या रोगापासून पशूंचा बचाव करण्यासाठी पशुपालकांनी प्रतिबंधात्मक लसीकरणाचा लाभ घ्यावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96374 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..