इचल ः डीकेटीई वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल ः डीकेटीई वृत्त
इचल ः डीकेटीई वृत्त

इचल ः डीकेटीई वृत्त

sakal_logo
By

50306
इचलकरंजी ः चेन्नई येथे झालेल्या हॅकॅथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना डीकेटीईची टीम अल्फा.

डीकेटीईची ‘टीम अल्फा’ देशात प्रथम
‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ स्पर्धा ः लाखाचे बक्षीस पटकावले

इचलकरंजी, ता. १५ ः भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या ‘इनोव्हेशन कौन्सिल’ व एआयसीटीई, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने चेन्नई येथे आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ स्पर्धेत डीकेटीईचा ‘टीम अल्फा’ हा संघ देशामध्ये अव्वल ठरला. संघाचा एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरव केला. स्पर्धेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे झाले.
स्पर्धेसाठी केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून दिलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी आधुनिक संकल्पनेद्वारे त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देत समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. भारतातून आलेल्या अर्जामधून १५० हून अधिक टीम यासाठी पात्र झाले होते. त्यानंतर प्रत्यक्षात चेन्नई येथे ग्रँड फायनलमध्ये निवडक उत्कृष्ट टीमची निवड झाली होती. ही स्पर्धा सॉफ्टवेअर व हार्डवेअर विभागामध्ये झाली. हार्डवेअर विभागामध्ये १२० तास स्पर्धा सुरू होती.
यामध्ये बीटेक इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगमध्ये शिकत असलेले साबीर सजदे, प्रणव चौगुले, अभिषेक मोहिते, श्रद्धा पाटील, प्राजक्ता पवार व बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील प्रथमेश अरबळी यांच्या टीमने यश मिळवत भारतातून प्रथम येण्याचा मान पटकावला. विद्यार्थ्यांना इलेक्ट्रीकल विभागाचे प्रमुख व डीन डॉ. आर. एन. पाटील व प्रा. ए. ए. मालगावे यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी ‘सोलार पॅनेल विथ सोलार ट्रॅकिंग डिव्हाईस विदाउट पॉवर कन्झंम्शन’ या विषयावर प्रकल्पाची मांडणी केली होती. प्रकल्पासाठी डिझाईन पेटेंटही मंजूर झाले आहे. विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96382 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..