निधन आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन आवश्‍यक
निधन आवश्‍यक

निधन आवश्‍यक

sakal_logo
By

02235
सुशिला पाटील
नागाव, ता. १५ : राजारामपुरी, कोल्हापूर येथील श्रीमती सुशिला आनंदराव पाटील ( वय ७९ ) यांचे निधन झाले. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक व स्मॅकचे माजी अध्यक्ष अतुल आनंदराव पाटील व उद्योजक अनुप ऊर्फ बंटी पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ( ता. १८ ) पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.
-
५०३१६
राजाराम जाधव
वडणगे ःयेथील जाधव मळ्यातील राजाराम श्रीपती जाधव (वय ७८ ) यांचे निधन झाले. शंकर नागरी पतसंस्थेतून ते व्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १७) आहे.
-
५०३१४
विजय मानकापुरे
कोल्हापूर ः विजय नरहरी मानकापुरे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
-
50367
एकनाथ पाटील
बालिंगा : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील एकनाथ विठू पाटील (वय 90) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता.१६) होईल.
-
gad154.jpg : तुकाराम पोवार 50324

तुकाराम पोवार
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील माजी सैनिक तुकाराम सावबा पोवार (वय 72) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, जावई आहेत. रक्षाविसर्जन उद्या (ता. १६) आहे.
-
00610
शेवंताबाई पाटील
असळज : येथील शेवंताबाई धोंडीराम पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. डी. वाय. पाटील कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय धोंडीराम पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १६) आहे.
-
01750
आनंदराव सूर्यवंशी
पेठवडगाव :मंगरायाचीवाडी येथील आनंदराव बाबुराव सूर्यवंशी (वय ८५) यांचे निधन झाले. जलसंपदा विभागाचे कर्मचारी पोपट सुर्यवंशी यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १६) आहे.
-
03918
डॉ. सुकुमार बुरसे
जयसिंगपूर : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील डॉ. सुकुमार बाबुराव बुरसे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांनी गेल्या ५० वर्षात आळते (ता. हातकणंगले), काळमवाडी, संभाजीपूर परिसरात वैद्यकीय सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. सुरज बुरसे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उदगाव येथे शुक्रवारी (ता.१६) आहे.
-
50388
कामिनी भुर्के
कोल्हापूर ः शिवाजी पेठेतील कामिनी श्रीधर भुर्के (वय ८१) यांचे निधन झाले. सुवर्ण कारागिर जयंत व धनंजय भुर्के यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १७) आहे.
-
50389
मंगल कांबळे
कोल्हापूर ः शासकीय मुद्रणालय येथील सेवानिवृत्त कर्मचारी मंगल पांडुरंग कांबळे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १६) आहे.
-
50390
कृषात कांबळे
कोल्हापूर ः कुर्डू (ता. करवीर) येथील कृषात दत्तु उर्फ के. डी. कांबळे यांचे निधन झाले. ते भोगावती सहकारी साखर कारखान्यातून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
-
50395
महादेव व्हरांबळे
कोल्हापूर ःआर. के. नगर येथील महादेव पंडित व्हरांबळे (वय ७४) यांचे निधन झाले. ते शासकीय सेवेतून लेखापरिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी, भाऊ, बहिणी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
-
02512
हंबीरराव पाटील
शिरोली पुलाची : येथील मकाजी पाटील मळ्यातील हंबीरराव तुकाराम पाटील (वय ६८) यांचे निधन झाले. ते जुन्या काळातील मल्ल व महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.१७) आहे.
-
50409
सुशिला पोवार
कोल्हापूर : खंडोबा तालीम परिसरातील श्रीमती सुशिला काशिनाथ पोवार (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन शनिवारी (ता.१७) आहे.
-
02808
सदाशिव जाधव
उजळाईवाडी ः गडमुडशिंगी (ता करवीर) येथील सदाशिव धोंडीराम जाधव (वय ७३ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१६) आहे.
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96392 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..