प्रकल्प गुजरातेत गेल्याच्या निषेधार्थ युवा सेनेची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्प गुजरातेत गेल्याच्या निषेधार्थ युवा सेनेची निदर्शने
प्रकल्प गुजरातेत गेल्याच्या निषेधार्थ युवा सेनेची निदर्शने

प्रकल्प गुजरातेत गेल्याच्या निषेधार्थ युवा सेनेची निदर्शने

sakal_logo
By

50332
गडहिंग्लज : फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातेत गेल्याच्या निषेधार्थ युवा सेना व शिवसेनेच्या वतीने गुरुवारी दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.

प्रकल्प गुजरातेत गेल्याच्या
निषेधार्थ युवा सेनेची निदर्शने
गडहिंग्लज, ता. १५ : शिंदे-भाजप सरकारच्या हलगर्जीपणामुळे एक लाखावर युवकांना रोजगार देणाऱ्या फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप करून येथील युवा सेनेच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी निषेध स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. यामुळे लाखो युवकांना रोजगाराला मुकावे लागले. म्हणून सरकारच्या निषेधार्थ आज दसरा चौकात तालुका युवा सेना व शिवसेनेने निदर्शने केली. गुजरामध्ये गेलेला हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या वेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख संतोष चिकोडे, युवासेनेचे समन्वयक सुजित पाटील, युवासेना तालुकाप्रमुख बाबूराव नाईक, शहरप्रमुख राज कोरवी, उपशहरप्रमुख सुमित कोरवी, शिवसेना उपशहरप्रमुख संदीप कुराडे, काशिनाथ गडकरी, शिव सहकार सेनेचे उपजिल्हा संघटक अशोक खोत, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, भरत जाधव, तेजस घेवडे, अब्दुल देसाई, संभाजी यडूरकर, शुभम शेंडगे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96413 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..