अंबाबाई मंदिर स्वच्छता प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिर स्वच्छता प्रारंभ
अंबाबाई मंदिर स्वच्छता प्रारंभ

अंबाबाई मंदिर स्वच्छता प्रारंभ

sakal_logo
By

लोगो- वेध नवरात्रोत्सवाचे

50397
........
ड्रोनसह डोअर डिटेक्टरच्या कॅमेऱ्याची नजर

अंबाबाई मंदिर परिसरात देवस्थानची व्यवस्था; यंदा पहिल्यांदाच तांत्रिक साधनांचा वापर
बी. डी. चेचर ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिर परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने २४ तास पहारा ठेवण्यात येणार आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतानाच प्रत्येक भाविक मेटल डिटेक्टरच्या कॅमेऱ्यातून स्कॅन होणार आहे. गर्दीवर नियंत्रणासह सुरक्षिततेच्या कारणावरून ही व्यवस्था पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात येत आहेत. सुरक्षिततेसाठी यंदा पहिल्यांदाच अत्याधुनिक साधनांचा वापर मंदिर आणि परिसरात केला जात आहे.

नवरात्रोत्सवात लाखो भाविक करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत रांगा लागतात. पालखी सोहळा, पंचमी, अष्टमी, नगरप्रदक्षिणा, दसरा अशा महत्त्वाच्या दिवशी तर भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होते. कोरोनानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव होत असल्याने यंदा मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच प्रशासनातर्फे नियोजन केले आहे. याचाच भाग म्हणून अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करत गर्दीचे नियोजन करण्यासह अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. अत्याधुनिक यंत्रणांच्या वापरामुळे अनुचित प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. एखादी अशा प्रकारची घटना घडल्यास पोलिसांना तपासात या यंत्रणाची मदत मिळणार आहे. या यंत्रणांचा वापर अन्य मंदिरातही केला जाणार आहे. नवरात्रोत्सवातील नियोजनासाठी देवस्थान प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, उपअभियंता सी. एस. पाटील यांच्याकडून सुरू झाले आहे. सीसीटीव्ही सुरक्षा नियंत्रक राहुल जगताप व सहाय्यक अभिजित पाटील यांनी याचे प्रशिक्षण घेतले आहे.

चौकट
मंदिर परिसराची स्वच्छता
नवरात्रोत्सव १० दिवसांवर आला असून, अंबाबाई मंदिरांसह नवदुर्गा मंदिरात तयारीला प्रारंभ झाला आहे. मंदिराच्या दीपमाळा, गरूड मंडप आणि महाकाली मंदिराची स्वच्छता आज केली. मुंबई येथील संजय मेंटेनन्स कंपनीच्या २० जणांच्या टीमकडून आजपासून स्वच्छतेस प्रारंभ झाला. अंबाबाई मंदिरात स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर विद्युत जोडण्यांची चाचणी घेतली जाणार आहे. देवीच्या अलंकारांसह गाभाऱ्याची स्वच्छता लवकरच होणार आहे. पूर्व दरवाजाच्या बाजूने दर्शन मंडप उभारला जाणार असून, तेथे महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असतील. त्याशिवाय दर्शन मंडपात एलईडी स्क्रीनसह पंखे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. उत्सवकाळात दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, त्याचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96422 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..