पारंपरिक गीतांचे जतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपरिक गीतांचे जतन
पारंपरिक गीतांचे जतन

पारंपरिक गीतांचे जतन

sakal_logo
By

50362


‘आजीची शिकवण’तून जोतल्या चार पिढ्या
पारंपरिक गीतांचे जतन; स्वाती माने यांच्या व्हिडीओतून माया, वात्सल्य टवटवीत
नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः आजीने गायलेल्या ओव्या आज जुनाट वाटत असल्या तरी त्यातला माया, ममता, वात्सल्याचा भाव ताजा, टवटवीत आहे, याची प्रचिती गृहिणी असलेल्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील स्वाती श्यामसुंदर माने यांचे व्हिडीओ पाहताना मिळते. परंपरेतून आलेल्या ओव्या, पाळणा, गौरीगीते, मंगळागौरीची गाणी, हादग्याची गीते, लग्न समारंभातील गीते, अंगाई, उखाणे अशा पारंपरिक गीतांचा खजिनाच नव्या पिढीसमोर उलगडला. ‘आजीची शिकवण’ या नावाने त्यांनी यू ट्युब चॅनेल सुरू केले आणि त्या यू ट्युबवरच्या तब्बल चार पिढी जोडणाऱ्या ‘नायिका’च ठरल्या आहेत.
बालवयातच आजीच्या कुशीत राहूनच आजीने गायलेली गाणी रोजरोज ऐकली. त्यांना त्या आजीच्या गाण्यांची लय आणि सुरावट याची भारी गंमत वाटली.
एक दिवस त्यांनी ही गाणी वहीत लिहिली आणि ही गाणी त्यांच्या शिणलेल्या मनात उभारी देऊ लागली. ही गाण्याची वही लग्न झाल्यानंतर स्त्री धनाच मोल समजून सासरी आणली. त्याला जवळपास ३० वर्षे होऊन गेली. मात्र, लॉकडाऊनमध्ये नकारात्मकतेचे सावट असताना त्यांनी या आजीच्या आठवणीचा गाण्यांचा सूर आळवला आणि नव्या पिढीतील त्यांचा मुलगा निखिल आणि मुलगी अंजली यांनी व्हिडीओ बनवले. एकेक ओळी सुरतालात मोबाईलच्या कॅमेरात गुंजू लागला आणि तेच व्हिडीओ आईने गायलेली आजीची आठवण परंपरा, संस्कृती, आनंद, प्रसन्नता अशी कित्येक गुणवैशिष्ट्ये सांगू लागले. बघता बघता या व्हिडीओंना प्रेक्षकांनी आपलंस केले आणि नवी पिढी कितीही पुढारलेली असली, ग्लोबल झाली असली तरी आजीने गायलेल्या ओव्या असो किंवा बारश्यातील पाळणा असो या पिढीला मोहित करतो. ‘आजीची शिकवण’ देणाऱ्या यू ट्युब चॅनेलने एक लाखांचा टप्पा गाठला.
----------
गीते वेगवेगळ्या चालींत
आजी, आईच्या तोंडून ऐकण्यास मिळणारी ही गीते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या चालींमध्ये असल्याची दिसून येतात. गाणी गाताना आवाजातील चढ-उतार, गाणी म्हणण्याची लय यात दिसणारी विविधता याचेही सौ. स्वाती यांनी निरीक्षण केले. त्यामुळे त्यांनी ही पारंपरिक गीते यू ट्युब चॅनेलवर वेगवेगळ्या चालींत सादर केली आहेत.
-----
पारंपरिक गीतांमुळे ऊर्जा
जात्यावरील ओव्या, अभंग अशी पारंपरिक गीते मनाला ऊर्जा देतात. या गीतांमुळे आपसुकच आई, आजी यांच्या आठवणीत रमता येते, यामुळे नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते. परिणामी, मानसिक त्रासातून थोडा वेळ तरी दिलासा मिळतो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96423 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..