राष्टपिता पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्टपिता पंधरवडा
राष्टपिता पंधरवडा

राष्टपिता पंधरवडा

sakal_logo
By

महापालिकेतर्फे उद्यापासून
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा

कोल्हापूर, ता. १५ ः महापालिकेतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या विविध तक्रारी अर्जांवर मुदतीत कार्यवाही करून त्यांची निर्गत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महापालिकेकडे प्रलंबित असलेले सर्व अर्ज निकाली काढण्याकरीता प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व विभागप्रमुखांना निर्देश दिले आहेत. शासन निर्देशानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअन्वये जाहीर केलेल्या सेवा, आपले सरकार पोर्टल, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंदी, नवीन नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे, मागणी पत्र देणे व विविध विभागांकडील प्रलंबित असणारे तक्रारी व मागणी अर्ज यांची तातडीने पूर्तता करण्यात येणार आहे. दरदिवशी निर्गत होणाऱ्या तक्रारींबाबतचा अहवाल मागण्यात येणार आहे. कार्यालयाकडील रेकॉर्ड वर्गवारी करून स्वच्छता करण्यात येणार आहे. समाप्तीनंतर ५ ऑक्टोबरला सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून १० सप्टेंबरअखेर प्रलंबित प्रकरणांपैकी निर्गत केलेल्या व निर्गत न झालेल्या अर्जांबाबत स्वयंस्पष्ट कारणांसह प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. कामकाजाचा प्रगती अहवाल १० ऑक्टोबरपर्यत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96491 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..