पाऊस १५ सप्टेंबर २०२२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस १५ सप्टेंबर २०२२
पाऊस १५ सप्टेंबर २०२२

पाऊस १५ सप्टेंबर २०२२

sakal_logo
By

जिल्ह्यात नद्यांच्या
पाणी पातळीत घट
दिवसभर पावसाची उघडझाप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः पावसाने उघडीप दिल्यामुळे पंचगंगा पुन्हा पात्रात गेली असून संथगतीने पाणी पातळी कमी होत आहे. पंचगंगा नदी पातळी २६ फूट आठ इंचापर्यंत खाली आली आहे. राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा अद्याप खुला असून, त्यातून ३ हजार २८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अद्यापही जिल्ह्यातील २६ बंधारे पाण्याखाली आहेत. भारतीय हवामान विभागाकडून उद्या (ता. १६) ‘यलो अलर्ट’चा अंदाज व्यक्त केल्यामुळे काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी चोवीस तासांत चार फुटांहून अधिक कमी झाली आहे. सकाळी आठ वाजता २९ फूट ३ इंचावर होती. राधानगरी धरणात ८.२४ टीएमसी पाणी साठा आहे. सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील ३६ बंधारे पाण्याखाली होते. रात्री आठपर्यंत त्यापैकी २६ बंधाऱ्यांवर पाणी असून उर्वरित बंधाऱ्यांवरील पाणी पात्रात गेले आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत एकूण सरासरी ८.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हातकणंगले- १.५, शिरोळ -१, पन्हाळा- ५.६, शाहूवाडी- १७.७, राधानगरी- ११.५, गगनबावडा- ४३.७, करवीर- ४.५, कागल- ४.४, गडहिंग्लज- ५.२, भुदरगड- १५, आजरा- १४.८, चंदगड- १७.९.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96504 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..