वक्तृत्व स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तृत्व स्पर्धा
वक्तृत्व स्पर्धा

वक्तृत्व स्पर्धा

sakal_logo
By

दिगंबर जैन बोर्डिंगतर्फे २५ ला
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

कोल्हापूर : कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त येत्या २५ सप्टेंबरला राजस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे २१ वे वर्ष आहे. विजेत्यांना पंचवीस हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही माहिती बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे यांनी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आणि शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, चळवळ टिकली पाहिजे... पण ? महिला सक्षमीकरणाचा प्रवास : वास्तव आणि अपेक्षा, तरूणाई काल, आज आणि उद्या, पर्यावरणाचा तोल ढासळतोय... !, सत्तेच्या राजकारणात लोकशाही हरवत आहे, आधुनिकीकरणात हरवलेली नाती असे विषय आहेत. प्रत्येक महाविद्यालयातील दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. अनुक्रमे अकरा हजार, सात हजार, तीन हजार, उत्तेजनार्थ ३०१ रुपयांची (सहा बक्षिसे) व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी ५० रुपये शुल्क आहे. नावनोंदणीसाठी संयोजक कुबेर शेडबाळे यांच्याशी संर्पक साधावा असे आवाहन रोटे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96507 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..