निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

50366

ज्येष्ठ चित्रकार
डॉ. नलिनीताई भागवत यांचे निधन
कोल्हापूर, ता. १५ ः देशातील पहिल्या पीएचडीधारक ज्येष्ठ चित्रकार डॉ. नलिनीताई भागवत (वय ८४) यांचे शाहुपुरी येथील राहत्या घरी निधन झाले. मुंबईच्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट येथे त्यांनी अनेक वर्षे कला इतिहास शिकविला. याच काळात बडोदा येथील एम. एस. विद्यापीठाच्या फाईन आर्ट फॅकल्टीमध्ये पश्चिम भारतातील समकालीन कलेचा विकास हा अभ्यासपुर्ण प्रबंध तेथील कला इतिहास विभागात सादर करून पीएच.डी मिळवली. बडोद्याच्या विभागातून पीएच.डी मिळवणाऱ्या त्या पहिल्या विद्यार्थिनी व जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या इतिहासातही समकालीन कला इतिहासाच्या विषयात पीएच.डी मिळवणाऱ्या पहिल्या कलाशिक्षिका ठरल्या. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये चित्रकार गुरुवर्य दत्ताजीराव दळवी यांच्याकडे त्यांनी चित्रकलेचा अभ्यास केला. जलरंग व तैलरंगात त्यांनी प्राविण्य मिळवले. चित्रकार व शिल्पकार रविंद्र मेस्त्री यांनी दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये धुरा सांभाळली तेव्हा त्यांच्या हाताखाली पाच वर्षे सहाय्यक अधिव्याख्याती म्हणून काम पाहिले. दिल्लीच्या राष्ट्रीय ललितकला अकादमीच्या जनरल कौन्सिलसाठीही त्यांनी १० वर्षे दोन सत्रात काम केले. त्यांना २०१५ मध्ये राज्य शासनातर्फे राज्य कला प्रदर्शनात गौरवले होते. नाशिकच्या वा. गो. कुलकर्णी कलानिकेतन महाविद्यालय आणि कोल्हापुरातील रंगबहार या संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले आहे. त्यांच्या मागे दोन बहिणी, भाचे असा मोठा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96514 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..