ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करा
ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करा

ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करा

sakal_logo
By

ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण व्हावे
---
ब्राह्मण परिषदेची मागणी; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः ब्राह्मण समाजाची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे, याची नेमकी माहिती समोर यावी, यासाठी ब्राह्मण समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वेक्षणाला मान्यता दिली होती. याबाबत विद्यमान राज्य सरकारने पुढील कार्यवाही करावी. तसेच, अमृत संस्था योजना कार्यान्वित करावी. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
श्री. कुलकर्णी म्हणाले, की माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्तीशः लक्ष घालून खुल्या प्रवर्गासाठी अमृत महामंडळाची स्थापना व्हावी, यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन २८ जून २०२१ ला शासकीय आदेश काढून ट्रस्टला मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटींची तरतूद करून संस्थेसाठी १७ पदेही मंजूर केली. वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे कार्यालयही सुरू झाले. दरम्यान, राज्य सरकार बदलले. शिंदे-फणडवीस सरकारने अमृत महामंडळाचा विस्तार केला पाहिजे, यासाठी शिंदे-फडणवीस सरकार हे समाजाच्या समस्या सोडविण्याबाबत अधिक गतीने काम करेल व समस्या सोडविण्याबाबत प्रशासनाला निर्देश देतील, अशी अपेक्षा आहे. सूरज कुलकर्णी, अनंत अष्टेकर, स्वानंद गोसावी, प्रसाद कुलकर्णी, दिलीप धर्माधिकारी, कमलाकर देशपांडे उपस्थित होते.

मागण्या अशा ः
* ई रूपी योजना विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्कॉलरशिप मिळण्याच्या दृष्टिकोनातून तयार केली आहे
* स्वराज्य शिलेदार ही योजना युवक-युवती यांना उद्योग-व्यवसायासाठी सहकार्य करण्याच्या उद्देशाने तयार केली आहे
* अमृत योजना संस्था ट्रस्ट अंतर्गतच कार्यान्वित करावी
* अमृत योजनेचे कार्यालय कार्यान्वित ठेवावे आणि ही योजना नियोजन विभागाकडे हस्तांतरित करावी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96520 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..