हिंदी दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदी दिन उत्साहात
हिंदी दिन उत्साहात

हिंदी दिन उत्साहात

sakal_logo
By

आविष्कार इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रम
बालिंगा : पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील आविष्कार इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये हिंदी दिवस विविध उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. प्राचार्य शैलजा कर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख स्वप्नील पाटील व हिंदी विषयाच्या शिक्षिका अनुराधा कुकडे यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. दरम्यान, पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कविता वाचन, हिंदी भाषेचे महत्त्‍व सांगणारे गीत गायन, स्लो मोशन नृत्य, हिंदी हास्य चारोळी, विनोदी नाटिका सादर करून धम्माल केली. कर्णेकर यांनी हिंदी ही भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. इतर काही देशातही हिंदी भाषा बोलली जाते. परदेशात ज्या ठिकाणी भारतीय आहेत, त्या ठिकाणी शक्‍यतो याच भाषेचा वापर केला जातो, असेही त्यांनी सांगितले. सलवा मालदार हिने आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96525 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..